देवेंद्र फडणवीस हे सध्या ना-आवडाबाई झालेत!; ‘अर्धवटराव’च्या टीकेवरून उद्धव ठाकरेंचा पलटवार

मला अर्धवटराव म्हणत असतील तर हे काय आवडाबाई आहेत का?, पण ते...; उद्धव ठाकरेंचा भर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस सवाल

देवेंद्र फडणवीस हे सध्या ना-आवडाबाई झालेत!; 'अर्धवटराव'च्या टीकेवरून उद्धव ठाकरेंचा पलटवार
Uddhav Thackeray-devendra fadnavis
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 3:23 PM

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न विचारला आहे. मला अर्धवटराव म्हणत असतील तर देवेंद्र फडणवीस काय आवडाबाई आहेत का?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. पण सध्या देवेंद्र फडणवीस हे ना-आवडाबाई झाले आहेत, असं ठाकरेंनी म्हटलं आहे.

अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो, ते पूर्ण ऐकलेच नाही… असो, आता ऐका… याच अर्धवटपणामुळे तुम्हाला पानिपत शब्द अलिकडे अधिक आठवायला लागला … म्हणून म्हणतो स्क्रिप्ट रायटर बदला!, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. या टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

बऱ्याच दिवसांनंतर मुंबईतील नगरसेवकांची बैठक घेतली. मुंबई महापालिका विसर्जित करून आता जवळपास एक वर्ष होऊन गेलं आहे. पण निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. पावसाप्रमाणे निवडणुका सुद्धा आता लांबत चाललेल्या आहेत. पण निवडुका घेण्याची हिंमत आताचं बेकायदेशीर सरकार करत नाहीये, उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महापालिकेत पैसा उधळला जातोय. त्याला जाब विचारणारं कुणीच नाही. जेव्हा महापालिकेत लोकांचे प्रतिनिधी असतात. तिथं चर्चा होते. तिथं एखाद्या निर्णायाला मंजुरी किंवा ना-मंजुरी दिली जाते. पण आताची परिस्थिती पाहिली तर वारेमाप खर्च केला जातोय. त्यावर कुणाचं नियंत्रण नाही. या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी, जाब विचारण्यासाठी येत्या एक जुलैला ठाकरे गट महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. आदित्य ठाकरे आणि इतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते या मोर्चाचं नेतृत्व करतील, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. समुद्राचं खारं पाणी गोडं पाणी करण्याबाबतचा प्रकल्प सरकारने रोखला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीवर जात माथा टेकवला. त्यावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. जेव्हा आमची युती होती तेव्हा लालकृष्ण आडवाणी सुद्धा जिन्नाच्या कबरीवर नतमस्तक झाले होते आणि नवाज शरीफच्या वाढदिवसाला सुद्धा केक खायला आपले पंतप्रधान गेले होते. त्यामुळे मला वाटतं की स्वच्छ आणि एका विचाराने पुढे जाण्याची गरज आहे. लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्याची गरज नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

गद्दारांकडे स्वत:ची ताकद देखील नाहीये. त्यांना ताकददेखील चोरावी लागत आहे. त्यांना सरकारी यंत्रणा आणि पोलिसांची ताकद लावावी लागते आहे. मग स्वत:तील मर्दुमकी कुठंय?, असा सवाल ठाकरेंनी शिंदे गटाला विचारला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.