Sharad Pawar : महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेबांना देखील आवडला असता, शरद पवारांनी सांगितलं राजकीय पेच सुटण्याचं गुपित

शनिवारी पुण्यात'कनेक्ट महाराष्ट्र कन्क्लेव्ह'चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेते उपस्थित होते. त्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची संयुक्त मुलाखत घेतली.

Sharad Pawar : महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेबांना देखील आवडला असता, शरद पवारांनी सांगितलं राजकीय पेच सुटण्याचं गुपित
महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेबांना देखील आवडला असताImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 7:49 AM

मुंबई : महाविकास आघाडीचं (MVA) सरकार स्थापन झाल्यापासून त्यांच्यात अंतर्गत वाद असल्याची टीका विरोध सातत्याने करीत आहे. पण महाविकास आघाडी सरकार किती मतबूत आहे. हे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते वारंवार सांगत आहेत. काल एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक विधान केलं. त्या वक्तव्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीचा जो प्रयोग झाला तो बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) आवडला असता. तसेच जेव्हा राजकीय मतभेद होतात. त्या वेळेला बाळासाहेबांनी काय केलं असतं हे डोक्यात येतं आणि निर्माण झालेल्या वादावर उत्तर मिळतं असं शरद पवारांनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकार स्थापण झाल्यापासून तिन्ही पक्षांचं सरकार असून त्यांच्यात मेळ नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. परंतु त्याला महाविकास आघाडी वारंवार उत्तर देत आहे.

एकत्रित मुलाखत झाली…

शनिवारी पुण्यात’कनेक्ट महाराष्ट्र कन्क्लेव्ह’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेते उपस्थित होते. त्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची संयुक्त मुलाखत घेतली. त्यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, कन्हैयाकुमार, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते. या मुलाखतीसाठी युवकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तसेच अनेक प्रश्नांची चांगली उत्तरे दिल्याने तरूण देखील खूश झाल्याची माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्री असतानाची आठवण सांगितली

शरद पवारांनी काल त्यांच्या मुख्यमंत्री काळातील एक आठवण सांगितली. तेव्हा त्यांच्या मतदारसंघातील एक महिला मुख्यमंत्री असताना तिचे काम घेऊन मुंबईत आली. मी तिला नावाने हाक मारली. मी नावाने हाक मारल्यानंतर ती तिचं काम विसरून गेली अन् गावात सगळ्यांना सांगितले. मला साहेबांनी नावाने हाक मारली. विशेष म्हणजे मी त्यावेळी माझ्या मतदार संघातील पन्नास टक्के लोकांना नावाने ओळखायचो. आता तसं होतं नाही. त्यांच्या आजोबांचं नाव सांगितलं की कळतं हा कुणाच्या घरातलं आहे अशी एक आठवण त्यांनी सांगितली.

हे सुद्धा वाचा

चित्रपटांच्या माध्यमातून खोटा इतिहास दाखवला जात आहे.

दी कश्मीर फाइल्स चित्रपटात कश्मीरमधील अत्यंत खोटी स्थिती दाखवण्यात आली आहे. त्यावेळी कश्मिरी पंडितांच्या होत होत्या, विशेष म्हणजे त्या काळात केंद्रात देखील भाजपच्या समर्थनाचे सरकार होते. आतातर मागील आठवर्षापासून केंद्रात भाजपचेच सरकार आहे. काश्मीर पंडितांना संरक्षण देण्यात भाजप सरकार कमी पडत आहे.

पण, चित्रपटाच्या माध्यामातून लोकांना खोटा इतिहास दाखवला जात आहे अशी टीका शरद पवारांनी केली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.