‘राजकारण करायला पुढे, राज्यातील प्रश्नावर एकदा तरी केंद्राला पत्र लिहिलं का?’ रोहित पवारांचा फडणवीस आणि चंद्रकांतदादांना सवाल

नगर पंचायत निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला सर्वाधिक जागा मिळालेल्या राज्यात भाजपाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि राहिल असा दावा केलाय. त्याबाबत विचारलं असता फडणवीस नेहमी स्ट्राईक रेटची भाषा करतात. मात्र, महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट जास्त आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय.

'राजकारण करायला पुढे, राज्यातील प्रश्नावर एकदा तरी केंद्राला पत्र लिहिलं का?' रोहित पवारांचा फडणवीस आणि चंद्रकांतदादांना सवाल
रोहित पवार, देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 5:22 PM

मुंबई : नगर पंचायत निवडणुकीचा निकाल (Nagar Panchayat Election Result) बुधवारी लागला. या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक भाजपचे निवडून आले. मात्र, सर्वाधिक नगरपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच क्रमांक एकचा पक्ष ठरल्याचा दावा पक्षाचे नेते करत आहेत. दरम्यान, कर्जत नगर पंचायतीवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी वर्चस्व मिळवलं आहे. त्यानंतर आज रोहित पवार यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर जोरदार टीका केलीय. राजकारण करायला पुढे असतात, महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी एकदा तरी त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं का? केंद्रानं अन्य राज्याला आपत्ती व्यवस्थापन निधी दिला, महाराष्ट्राला मात्र कर्मचारीही दिले नाहीत, अशी टीका रोहित पवार यांनी केलीय.

नगर पंचायत निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला सर्वाधिक जागा मिळालेल्या राज्यात भाजपाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि राहिल असा दावा केलाय. त्याबाबत विचारलं असता फडणवीस नेहमी स्ट्राईक रेटची भाषा करतात. मात्र, महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट जास्त आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय.

रोहित पाटलांना पक्षात मोठी जबाबदारी मिळणार?

रोहित पाटील यांचं कौतुक करताना रोहित पवार म्हणाले की, रोहित पाटीलसारखी मुलं विधानसभेत येणं गरजेचं आहे. त्यांचं वय कमी असेल त्यामुळे गेल्यावेळी त्यांना संधी दिली नसेल. मात्र, वय झालं की पक्ष नक्की विचार करेल, येत्या काळात पक्ष संधी देईल असा मला विश्वास आहे. रोहितला आता पक्षाचं पद किंवा जबाबदारी द्यायला हवी, असं मोठं आणि सूचक वक्तव्यही रोहित पवार यांनी यावेळी केलंय.

रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना आपली खानापूर नगर पंचायत राखता आली नाही. या ठिकाणी भाजपचा भोपळाही फुटला नाही. त्यावर बोलताना रोहित पवार यांनी पडळकरांना जोरदार टोला लगावलाय. भाजपनं काही कुटुंबावर बोलण्यासाठीच त्यांना विधान परिषदेचं सदस्यत्व दिलंय. कारण, मोठे नेते खालच्या पातळीवर जाऊन बोलू शकत नाहीत. त्यांचं काम फक्त बोलण्याचंच आहे, त्यांना दुसरं काय येतं, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केलीय.

भाजप आणि राम शिंदेंवर निशाणा

महाविकास आघाडीला चांगली मतं मिळाली, चांगल्या जागा निवडून आल्या. लोकांनी महाविकास आघाडीला कौल दिलाय. भाजपनं आपल्या पक्षात काय सुरु आहे ते पाहावं, इतरांना सल्ले देऊ नयेत. राम शिंदे यांनी राजकीय स्टंट केला. मात्र त्यांच्याजवळ आता कुणी राहिलं नाही. त्यांच्यावर जनतेचा नाही तर स्वत:चा दबाव आहे. कारण आता लोकं सोडून चालली आहेत, ते चित्र आपण कालच्या निकालात पाहिलं, अशा शब्दात रोहित पवार यांनी राम शिंदे यांना टोला लगावलाय.

इतर बातम्या : 

नेतेमंडळींनो बोलताना जरा जपूनच… तुमच्यावर मोबाईल कॅमेराची बारीक नजर!, सायबर तज्ज्ञांचा पुढाऱ्यांना मोलाचा सल्ला

BombBlast: एकामागून एक पाच स्फोटांनी लाहोर हादरलं, जमिनीत दीड फुटांचा खड्डा, 5 मृत्यू, 20 जण जखमी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.