Nagar Parishad Election : पुन्हा निवडणुकीचा धुरळा, 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर, कधी मतदान कधी निकाल? वाचा एका क्लिकवर

पाऊस कमी राहिल्यास 18 ऑगस्टला या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. तसेच लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला निकालही लागणार आहे.

Nagar Parishad Election : पुन्हा निवडणुकीचा धुरळा, 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर, कधी मतदान कधी निकाल? वाचा एका क्लिकवर
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 6:57 PM

मुंबई : राज्यात पुन्हा लवकरच निवडणुकींचा धुरळा उडताना बघायला पाहायला मिळणार आहे. कारण आजच 92 नगरपरिषदा (Nagar Parishad Election) आणि चार नगरपंचायतींसाठी (Nagar pachayat Election) निवडणूक जाहीर झालीआहे. या 92 नगर परिषदा या 17 जिल्ह्यातील आहेत. तर चार नगरपंचायतीची निवडणूक (Maharashtra Muncipal Election) ही याबरोबरच आटोपली जाणार आहे. पाऊस कमी राहिल्यास 18 ऑगस्टला या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. तसेच लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला निकालही लागणार आहे.  निवडणूक आयोगाने आजच हा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे आता पुन्हा अनेक नगरपरिषदेतली रस्सीखेच पाहायला मिळणार आहेत. तर स्थानिक राजकारणात अनेक ठिकाणी नवी समीकरणंही पाहायला मिळणार आहेत. अनेक ठिकाणी नव्या युती, नव्या आघाडी पाहायला मिळणार आहेत. स्थानिक लेव्हलच्या निवडणुकांचे गणित हे नेहमीच वेगळं राहिलं आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

  1. अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या अधिप्रमाणे करून 5 जुलैला प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
  2. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख ही 20 जुलै अशी ठरविण्यात आली आहे.
  3. तर नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरता उपलब्ध असण्याचा कालावधी 22 जुलै ते 28 जुलै असणार आहे, म्हणजेच या तारखेत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
  4. यात रविवार असल्यास उमेदवारी अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी तीही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
  5. अर्जांची छाननी झालेल्या उमेदवारांची यादी ही 29 जुलैला सकाळी अकरा वाजल्यापासून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
  6. तसेच अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही 4 ऑगस्ट दुपारी तीन वाजेपर्यंत अशी दिली आहे.
  7. अर्जावर काही आक्षेप अथवा अपील असल्यास आठ तारखेपर्यंत म्हणजेच 8 ऑगस्टपर्यंत तुम्हाला त्याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येणार आहे.
  8. तसेच निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख ही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतर दुसऱ्याच दिवशी करण्यात येणार आहे.
  9. 18 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल.
  10. तसेच मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याची तारीख ही 19 ऑगस्ट शुक्रवार अशी देण्यात आलेले आहे. सकाळी दहा वाजल्यापासून हे निकाल जाहीर व्हायला सुरुवात होणार आहे, असा एकूणच हा निवडणूक कार्यक्रम असणार आहे.

कोणत्या 17 जिल्ह्यांचा समावेश?

जळगाव, पुणे, सोलापूर, जालना, बीड, उस्मानाबाद, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, लातूर, बुलढाणा, या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.

पुन्हा ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक

या निवडणुकीचा आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही निवडणूक ही गेल्या काही निवडणुकांप्रमाणे ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका अशी मागणी अनेक पक्षांनी केली आहे, मात्र सुप्रीम कोर्टाने हे मागणी अमान्य करत वेळेत निवडणुका घेण्याचे निर्देश राज्याला दिलेले आहेत. त्यामुळे आता ही निवडणूकही ओबीसी आरक्षणाशिवायत पार पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ओबीसी वर्ग पुन्हा आक्रमक होण्याची ही शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.