Nagina UP Lok sabha Final Result : चंद्रशेखर आझाद 1 लाख 51 हजार मतांनी विजयी, भाजपच्या ओम कुमार यांचा पराभव
युपीतील नगीना लोकसभा मतदारसंघाची भिम आर्मीचे नेते तसेच आझाद समाज पक्षाचे नेते चंद्रशेखर यांच्यामुळे चर्चेत आली होती.
उत्तर प्रदेश येथील नगीना लोकसभा निवडणुकीत भिम आर्मीचे नेते चंद्रशेखर यांचा 1 लाख 51 हजार मतांनी विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या ओम कुमार यांचा पराभव केला आहे. यंदा नगीना लोकसभा मतदारसंघ चंद्रशेखर यांच्या उमेदवारीमुळे चर्चेमध्ये आला होता. येथे चंद्रशेखर आणि भाजप उमेदवार यांच्यात मुख्य चुरशीची लढत झाली. या जागेवर समाजवादी पार्टीने मनोज कुमार आणि बहुजन समाजवादी पार्टीने सुरेंद्र पाल यांना तिकीट दिले होते.
युपीतील नगीना लोकसभा मतदारसंघाची भिम आर्मीचे नेते तसेच आझाद समाज पक्षाचे नेते चंद्रशेखर यांच्यामुळे चर्चेत आली होती. चंद्रशेखर यांनी ही निवडणूक 1 लाख 51 हजार मतांनी जिंकली आहे. येथे भारतीय जनता पक्षाने तीनवेळा आमदार झालेल्या ओम कुमार यांना तिकीट दिले होते. तर समाजवादी पक्षाने माजी न्यायाधीश मनोज कुमार यांना तर बसपाने सुरेंद्र पाल यांना तिकीट दिले होते. परंतू प्रमुख लढत चंद्रशेखर आणि ओम कुमार यांच्यातच झाली.
चंद्रशेखर यांना एकूण 5,12,552 मते मिळाली. 3,61,079 लोकांनी भाजपच्या ओम कुमार यांना तर 1,02,374 लोकांनी समाजवादी पक्षाच्या मनोज कुमार यांना मतदान केले. बहुजन समाज पक्षाचे सुरेंद्र पाल सिंह 13,272 मतांसह चौथ्या स्थानावर राहिले. चंद्रशेखर 1,51,473 मतांनी विजयी झाले आहेत.
2024 मध्ये किती मतदान झाले?
नगीना लोकसभा मतदार संघ हा उत्तर प्रदेशमधील 17 राखीव लोकसभा मतदारसंघापैकी एक आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा मतदार संघ अस्तित्वात आला होता. या निवडणुकीत नगीना मतदार संघात पहिल्या टप्प्यात 60.75 टक्के मतदान झाले. 2019 मध्ये या मतदार संघात बहुजन समाजवादी पार्टीचा विजय झाला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत नगीना मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाचे नेते गिरीशचंद्र जाटव विजयी झाले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार डॉ.यशवंत सिंह होते. या निवडणुकीत बसपाच्या उमेदवाराला 5,68,378 मते मिळाली, तर भाजप उमेदवाराला 4,01,546 मते मिळाली. या निवडणुकीत बसपाला 56.3 टक्के मते मिळाली आहेत. बसपा उमेदवार 1,66,832 मतांच्या फरकाने विजयी झाले होते.