नागपूर पदवीधर निवडणूक : दोघांपैकी एका अभिजीत वंजारींचा उमेदवारी अर्ज बाद
यंदाच्या निवडणुकीत दोन अभिजीत वंजारी नावाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता.
नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील पाच उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत (Nagpur Graduate Constituency Election). त्यामुळे नागपूर पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात आता 26 उमेदवार आहेत. मात्र, अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर आहे. त्यामुळे 17 तारखेनंतर निवडणुकीच्या मैदानात किती उमेदवार राहणार हे स्पष्ट होईल (Nagpur Graduate Constituency Election).
31 उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरण्यात आले आहेत त्यामध्ये अविनाश तुपकर, प्रशांत डवले, रमेश फुले, धर्मेंद्र मंडलिक आणि अभिजित रविंद वंजारी (अपक्ष उमेदवार) यांचा समावेश आहे.
यंदाच्या निवडणुकीत दोन अभिजीत वंजारी नावाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी अपक्ष उमेदवार अभिजित रविंद वंजारी यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीचे अभिजीत गो. वंजारी हे अद्यापही निवडणुकीत कायम आहेत.
नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीत एकूण 31 उमेदवार रिंगणात उतरले होते. भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात यंदा भाजपने उमेदवार बदलत महापौर संदीप जोशी यांना संधी दिली. तर काँग्रेसकडून अभिजीत वंजारी यांना मैदानात उतरवण्यात आलं.
दरम्यान, निवडणुकीच्या रिंगणात संदीप दिवाकर जोशी आणि संदीप रमेश जोशी अशा नावाचे 2, तर अभिजीत गो. वंजारी आणि अभिजीत रविंद्र वंजारी अशा नावाचे 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी आता अभिजीत रविंद्र वंजारी यांचा अर्ज अपात्र ठरला आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम
- निवडणूक जाहीर : 5 नोव्हेंबर
- उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : 12 नोव्हेंबर
- अर्ज छाननी : 13 नोव्हेंबर
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस : 17 नोव्हेंबर
- मतदानाचा दिनांक : 1 डिसेंबर मतदान (सकाळी 8 ते सांयकाळी 5)
- मतमोजणी : 3 डिसेंबर
- निवडणूक प्रक्रिया संपण्याचा दिवस : 7 डिसेंबर
नागपूर पदवीधरसाठी एकूण ३१ उमेदवार, निवडणूक मैदानात 2 संदीप जोशी आणि 2 अभिजीत वंजारी! https://t.co/Fs7gMgPyy5 @SandipJoshiNGP @INCMaharashtra @BJP4Maharashtra #ElectionResults #graduates
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 13, 2020
Nagpur Graduate Constituency Election
संबंधित बातम्या :
विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक, पंकजा मुंडे समर्थकाचा अर्ज बाद