Nagpur MLC Election : ‘मी असमर्थता दर्शवली नाही’, पत्रकावर छोटू भोयर यांचं स्पष्टीकरण; देशमुखांसाठी काम करणार असल्याचाही दावा!

छोटू भोयर यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवल्याचं सांगत काँग्रेसनं अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, आपण निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली नसल्याचं भोयर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. तसंच देशमुख यांना निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

Nagpur MLC Election : 'मी असमर्थता दर्शवली नाही', पत्रकावर छोटू भोयर यांचं स्पष्टीकरण; देशमुखांसाठी काम करणार असल्याचाही दावा!
छोटू भोयर
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 10:17 PM

नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या (Legislative Council Election) मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना नागपुरात काँग्रेसच्या गोटात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसवर आपला उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. छोटू भोयर (Chotu Bhoyar) यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवल्याचं सांगत काँग्रेसनं अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, आपण निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली नसल्याचं भोयर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. तसंच देशमुख यांना निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

निवडणूक लढवण्यासाठी मी असमर्थता दर्शवली नाही. काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या पक्षकार मात्र मी असमर्थता दर्शवली असल्याचं म्हटलंय. पण जर काँग्रेसला वाटत असेल की ही निवडणूक छोटू भोयर यांच्या नावावर जिंकू शकत नाही. त्यामुळे जर त्यांनी उमेदवार बदलला असेल तर मी त्या निर्णयाचा स्वीकार करतो. मंगेश देशमुख यांच्या विजयासाठी मी जे जे करु शकतो ते या 12 तासात करेन. मात्र, पक्षानं असं का केलं याबाबत प्रदेशाध्यक्षांशी बोलूनच सांगेन, असं छोटू भोयर म्हणाले.

छोटू भोयर ताकदीने निवडणूक लढवत नसल्याची तक्रार!

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार बदलण्याचा प्रस्ताव हायकमांडकडं पाठवण्यात आला होता. त्यानंतर दिल्लीतून या निर्णयाला मंजुरी दिली. छोटू भोयर ताकदीने निवडणूक लढत नसल्याचा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आरोप होता. त्यामुळे उमेदवार बदलण्याचा प्रस्ताव पाठवल्याचं काँग्रेसच्या गोटात बोललं जातं होतं. अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन देण्यावर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचं एकमतही झालं होतं. मात्र, छोटू भोयर यांनी या सर्व चर्चेचं खंडण करत, मीच काँग्रेसचा उमेदवार असून, उमेदवार बदलाचा कुठलाही प्रस्ताव हायकमांडकडं गेला नसल्याचा दावा केला होता.

काँग्रेसचं पत्रक काय?

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पक्षाकडून डॉ. रविंद्र भोयर यांना उमेदवारी जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी उद्या दि. 10 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. मात्र, आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात डॉ. रविंद्र भोयर यांनी ही निवडणूक लढवण्यासाठी असमर्थता दर्शविल्याचं समजतं. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मान्यतेनं तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार मंगेस सुधाकर देशमुख यांना काँग्रेस पक्षाकडून पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. तरी या निवडणुकीतील मतदान करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांना तसंच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना या संदर्भात माहिती देण्यात यावी, असं पत्रक काँग्रेसकडून काढण्यात आलं आहे.

इतर बातम्या :

Photo : सीडीएस जनरल बिपिन रावत, मधुलिका रावत यांच्यासह मृत सैन्य अधिकाऱ्यांना पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंहांकडून श्रद्धांजली

Video : संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ, सांगलीत भीक मांगो आंदोलनाद्वारे सरकारचा निषेध

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.