NMC election 2022 : आरक्षण बदललं, रचना बदलली; नागपूर महापालितेतला प्रभाग 33चा गड कायम राखणार भाजपा?
मागील वेळी चार सदस्यीय प्रभागामध्ये पहिल्या तीन प्रभागात भाजपाचे वर्चस्व दिसून आले. याठिकाणी खुल्या प्रवर्गासह अनुसूचित जातीच्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांचे मतदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
नागपूर : नागपूर महानगरपालिकेची (NMC election 2022) रणधुमाळी आणि त्या अनुषंगाने राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मागील निवडणुकीत म्हणजेच 2017सालच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली होती. याठिकाणी मागील 15 वर्षांपासून भाजपाची सत्ता नागपूर महापालिकेत आहे. दरम्यान, सध्या कार्यकाळ संपल्याने संपल्यानं आयुक्तांकडे प्रशासक म्हणून जबाबदारी आहे. मागील वेळी चार सदस्यीय प्रभागरचना (Ward) होती. यावेळी तीन नगरसेवकांचे पॅनल असणार आहे. मागील वेळी प्रभाग क्रमांक 33मध्ये निर्विवादपणे भाजपाचे वर्चस्व दिसून आले. चार नगरसेवकांपैकी तिघे भाजपाचेच होते. यंदा तीन जणांच्या पॅनेलमध्ये कोण बाजी मारणार, याविषयी उत्सुकता असणार आहे. कारण वॉर्डांची रचना एकीकडे बदलली आहे, तर आरक्षणही बदलले आहे. इच्छुकांची आपले मतदार (Voter) टिकवून ठेवण्यासाठी धावाधाव होत आहे. 151 जागांसाठी 52 प्रभागांत मतदान होणार आहे.
प्रभागातील व्याप्ती कशी?
उंटखाना, वसरसपेठ, रेशीमबाग, चंदननगर, हनुमाननगर, बुधवार बाजार, सोमवारी क्वार्टर्स, केशवनगर अशी व्याप्ती असून ग्रेट नाग रोड, बैद्यनाथ चौक, खैरे कुणबी भवन, गजानन महाराज गेट, तुकडोजी पुतळा आदी महत्त्वाचे परिसर यात येतात.
लोकसंख्येचे गणित
प्रभाग 33मधील एकूण लोकसंख्या 45,815 इतकी आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 11,379 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1516 इतकी आहे.
कोण मारणार बाजी?
मागील वेळी चार सदस्यीय प्रभागामध्ये पहिल्या तीन प्रभागात भाजपाचे वर्चस्व दिसून आले. याठिकाणी खुल्या प्रवर्गासह अनुसूचित जातीच्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांचे मतदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भाजपा आपला गड कायम राखणार का, हा प्रश्न आहे.
विजयी उमेदवार (2017)
- 33 (A) वंदना भानुदास भगत – भाजपा
- 33 (B) भारती विकास बुंडे, भाजपा
- 33 (C) विशाखा शरद बान्ते, भाजपा
- 33 (D) मनोजकुमार धोंडुजी गावंडे, काँग्रेस
प्रभाग 33 (A)
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजपा | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
प्रभाग 33 (B)
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजपा | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
प्रभाग 33 (C)
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजपा | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
आरक्षण कसे?
मागील वेळी असलेले आरक्षण यंदा नसणार आहे. त्यात बदल झाला आहे. 33 अ हा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव असणार आहे. 33 ब हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी तर 33 क हा सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव असणार आहे.