सत्तेत असताना मंत्रालयात गेले नाहीत, आता विदर्भात येतायेत; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे नौटंकी आणि ढोंगीपणाचं राजकारण; विदर्भातील भाजप नेत्याचं टीकास्त्र

सत्तेत असताना मंत्रालयात गेले नाहीत, आता विदर्भात येतायेत; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 12:28 PM

नागपूर : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आज दुपारी ते उद्धव ठाकरे यवतमाळमध्ये असणार आहेत. यवतमाळ मधील लोहारा औद्योगिक वसाहती मधील रेमंड विश्रामगृहात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा म्हणजे नौटंकी आणि ढोंगी राजकारण आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कधीही विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही. आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय, असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

सत्तेवर असताना मंदिरं बंद ठेवून मदिरालय सुरू करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता मंदिरांत दर्शनासाठी जावं लागतंय. उद्धव ठाकरे आता तुम्ही कितीही दौरे केले तरी तुमचं ढोंगी राजकारण आणि सत्ता गेल्यामुळे सुरू असलेली नौटंकी जनता ओळखून आहे, असंही ते म्हणालेत.

उद्धव ठाकरे तुम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर आलाच आहात तर भाजपसोबत गद्दारी करून, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडून तुम्हाला काय मिळालं हेही एकदा जनतेला सांगून टाका, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्र व्यापी दौरा करणार आहेत. याच निमित्त आज ते विदर्भात आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे.

आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांचं अमरावतीत होणार आगमन आहे. या ठिकाणी आता कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे.

उद्धव ठाकरे हे पोहरादेवी इथे जगदंबा मातेचं दर्शन घेणार आहेत. संत सेवालाल महाराज समाधीचं दर्शन, बाबूसिंग महाराजांचं दर्शन, संत रामराम महाराज समाधी दर्शन ते घेणार आहेत.

महंत बाबूसिंग महाराज सुनील महाराज, जितू महाराज, कबिरदास महाराज यांच्या हस्ते उद्धव ठाकरे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार केला जाणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.