‘राजसाहेब नागपुरात आल्यानं आमची उर्जा दुप्पट!’ बैठकीआधी मनसैनिकांशी एक्स्क्लुझिव्ह संवाद, बैठकीच्या हॉलमध्ये सेल्फीसाठी लगबग

Raj Thackeray in Nagpur : टीव्ही 9 मराठीसोबत बैठकीसाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांनी बातचीत केली. यावेळी मनसैनिकांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. पाहा मनसैनिकांनी नेमकं काय म्हटलं?

'राजसाहेब नागपुरात आल्यानं आमची उर्जा दुप्पट!' बैठकीआधी मनसैनिकांशी एक्स्क्लुझिव्ह संवाद, बैठकीच्या हॉलमध्ये सेल्फीसाठी लगबग
राज ठाकरे नागपुरात Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 11:58 AM

नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur Politics) रविवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray in Nagpur) दाखल झाल्यापासून विदर्भातील मनसैनिकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारली आहे. सकाळपासूनच नागपुरात मनसेचं (Nagpur MNS) शक्तिप्रदर्शन पाहायला मिळालं आहे. रविभवनात राज ठाकरे नागपुरातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार होते. त्याआधी मनसेच्या कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी टीव्ही 9 मराठीने बातचीत केली. यावेळी कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या येण्यानं कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचं म्हटलं.

पाहा व्हिडीओ :

पदाधिकारी खूश

राज ठाकरेच्या दौऱ्यामुळे मनसैनिक प्रफुल्लित झाले आहेत. राज ठाकरे यांनी वारंवार नागपुरात येत राहावं आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवत राहावं, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. टीव्ही 9 मराठीसोबत बैठकीसाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांनी बातचीत केली. यावेळी मनसैनिकांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.

हे सुद्धा वाचा

विदर्भात पधबांधणीसाठी राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. नागपुरातील मनसेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारीही फेटे घालून बैठकीसाठी पोहोचल्या होत्या. दरम्यान, राज ठाकरे रवी भवतना पोहोचल्यानंतर महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंसोबत सेल्फी काढण्याचाही मोह आवरला आला नव्हता.

रविभवनातून थेट आढावा : Video

2019 नंतर पहिल्यांदाच ऑरेंज सिटीत

2019 नंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. मिशन विदर्भ अंतर्गत राज ठाकरे नागपूर, चंद्रपूर, बुलढणाा, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, राज ठाकरेंच्या दोन पत्रकार परिषदांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. या संपूर्ण दौऱ्यादरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची रणनिती ठरवली जाण्याची दाट शक्यता आहे.

नागपुरात ‘मनसे’ शक्तिप्रदर्शन

नागपूर हा खरंतर भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे नागपुरात राज ठाकरे नागपुरातील मनसैनिकांना उद्देशून कायम मार्गदर्शन करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रविभवनातील बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहे. तसंच स्थानिक पातळीवर काय घडामोडी घडत आहेत, याचाही माहिती ते जाणून घेतील.

नागपूरच्या रविभवनातील आढावा बैठकीनंतर प्रत्येक जिल्ह्याची आढावा बैठक स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत संपूर्ण दौऱ्यादरम्यान घेतली जाणार आहे. विदर्भातील राज ठाकरे यांचा दौऱ्यानं मनसे विदर्भात आपली ताकद वाढवण्यासाठी काय रणनिती अवलंबते, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.