Nagpur | पक्ष ही कुणाची पर्सनल प्रॉपर्टी नाही, तो शिवसैनिकांचा, नागपूरचे आमदार आशिष जैस्वाल यांचा उद्धव ठाकरेंना इशारा!

महाविकास आघाडीने दिलेल्या वागणुकीबद्दल खंत व्यक्त करताना आमदार आशिष जैस्वाल म्हणाले, ' पक्ष हा कार्यकर्त्यांचा असतो. महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार, खासदार, पंसदस्य जिल्हा पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. हे सत्य आहे.

Nagpur | पक्ष ही कुणाची पर्सनल प्रॉपर्टी नाही, तो शिवसैनिकांचा, नागपूरचे आमदार आशिष जैस्वाल यांचा उद्धव ठाकरेंना इशारा!
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 5:36 PM

नागपूरः पक्ष ही कुणाची पर्सनल प्रॉपर्टी नाही, पक्ष शिवसैनिकांचा आहे, असा टोला नागपूरचे शिवसेना आमदार आशिष जैस्वाल (MLA Aashish Jaiswal) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला. तसेच महाविकास आघाडीतून बंड करून केवळ 40 शिवसेना (Shivsena) आमदार बाहेर पडले. त्यामुळे अख्खं सरकार उलथवून टाकण्यात आलं. मात्र एकनाथ शिंदे यांच्या गटात येण्यासाठी आणखी अनेक नेते उत्सुक आहेत. विदर्भाचाच विचार केला तर शिवसेनेचे 70 टक्के खासदार, जिल्हा परिषद सदस्य,पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी यांचा गांभीर्यानं विचार करावा, असा इशारा आशिष जैस्वाल यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करत महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांमध्ये आशिष जैस्वाल यांचाही समावेश होता. नुकतेच हे आमदार आपापल्या मतदार संघात पोहोचले असून तेथे त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

मविआला 170 आमदारांचा अहंकार

महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढताना आमदार आशिष जैस्वाल म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला १७० आमदार असण्याचा अहंकार होता, त्याविरोधात आमदारांनी उठाव केला. त्यामुळे त्यांना खरी जागा दिसली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तावडीतून शिवसेनेला वाचवण्यासाठी आम्ही केलेला हा शिवसेनेचा प्रयत्न आहे. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवं सरकार आलं आहे. त्यामुळे विदर्भावरील अन्याय दूर होण्याची अपेक्षा आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यात गेल्या वेळेस सेनेचं एकंही मंत्रीपद नव्हतं, यावेळे सरकार विदर्भाला प्रतिनिधीत्व देणार अशी आशा आशिष जैस्वाल यांनी व्यक्त केली.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तावडीतून मुक्त केलं…

महाविकास आघाडीने दिलेल्या वागणुकीबद्दल खंत व्यक्त करताना आमदार आशिष जैस्वाल म्हणाले, ‘ पक्ष हा कार्यकर्त्यांचा असतो. महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार, खासदार, पंसदस्य जिल्हा पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. हे सत्य आहे. शिंदे यांच्या नेतृत्वात हे एकत्र येत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही वारंवार तक्रारी केल्या. विकास कामांसाठी निधी मिळत नव्हता. मंत्री टक्केवारी मागत असल्याच्या तक्रारी केल्या. पण त्यांनी मंत्र्यांचे कान टोचले नाहीत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तावडीतून शिवसेनेला आम्ही मुक्त केलंय. आणि जनादेशानुसार सेना – भाजपचं सरकार आणलं’.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.