नागपूर ZP निकाल : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुत्राचा दमदार विजय

राष्ट्रवादीच्या तिकीटावर नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सलील देशमुख मेटपांजरा येथून विजयी झाले.

नागपूर ZP निकाल : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुत्राचा दमदार विजय
Follow us
| Updated on: Jan 08, 2020 | 1:39 PM

नागपूर : अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या आठवड्याभराच्या आतच देशमुख कुटुंबात डबल धमाका झालेला आहे. अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी (Home Min Son Salil Deshmukh won) झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सलील देशमुख नागपुरातील मेटपांजरा येथून विजयी झाले आहेत. नागपूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलील देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

नागपूर ZP निकाल : गडकरी-बावनकुळेंच्या मूळगावीच भाजपला धोबीपछाड

सलील देशमुख हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच पक्षात सक्रिय आहेत. याआधीही अनिल देशमुख यांनी मुलासाठी विधानसभा निवडणुकीचं तिकीट मागितलं होतं. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी देशमुख आग्रही होते. परंतु विधानसभावारी हुकलेल्या सलील देशमुखांना जिल्हा परिषदेत झेंडा रोवण्यात यश आलं आहे.

नागपूरचा गड राखताना भाजपची चांगलीच दमछाक होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नागपुरात चांगली पकड घेतल्याचं दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही धक्का बसला आहे. नितीन गडकरींचं मूळ गाव असलेल्या धापेवाडा आणि बावनकुळेंचं मूळ गाव कोराडीमध्ये भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं.

नागपूरमधील 58 गटांच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीचा कल काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने झुकताना दिसत आहे. नागपूर हिंगणातून माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते रमेश बंग यांचे पुत्र दिनेश बंग विजयी झाले. येनवामधून शेकापचे समीर उमप, तर आरोली-कोदामेडीमधून काँग्रेसचे योगेश देशमुख विजयी झाले आहेत. या तिन्ही ठिकाणी भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला.

नागपूरमध्ये (Nagpur ZP Election Result) 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 12 पैकी 11 जागा मिळाल्या होत्या, तर फक्त एक जागा काँग्रेसला मिळाली होती. मात्र 2019 मध्ये चित्र पालटलं. काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून पाच जागा मिळवल्या. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषद जितकी भाजपला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाची आहे, तेवढीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही ती जिंकायची आहे.

निवडणुकांमध्ये नागपूरमध्ये विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे नागपूरचा गड राखण्यासाठी भाजपला मोठी कसरत (Home Min Son Salil Deshmukh won) करावी लागत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.