Maharashtra politics : आता शिवसेनेचे पदाधिकारीही शिंदे गटात जाणार! नागपुरात मोठा धक्का बसण्याची शक्यता

नागपुरात शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता शिवसेनेचे पदाधिकारी देखील शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत आहेत.

Maharashtra politics : आता शिवसेनेचे पदाधिकारीही शिंदे गटात जाणार! नागपुरात मोठा धक्का बसण्याची शक्यता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 10:41 AM

नागपूर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला (shiv sena) धक्क्यावर धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी 13 आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली होती. त्यानंतर हा आकडा वाढत जाऊन 40 वर पोहोचला आहे. शिवसेनेच्या 40 पेक्षा अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. दरम्यान शिवसेनेला बसणारे धक्के आजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. आता नागपुरातील (Nagpur) शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. हे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांच्या सपर्कात आहेत. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटातील आमदारांची देखील भेट घेतली आहे. या पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर आरोप केले आहेत.

पदाधिकारी बंडखोर आमदारांच्या संर्पकात

एकीकडे शिवसेनेचे 40 पेक्षा अधिक आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आता या आमदारांपाठोपाठ त्यांचे समर्थक असलेले शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवक देखील शिवसेनेला सोडून शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. नागपूरमध्ये असंच चित्र पहायला मिळत आहे. येथील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. यातील अनेक पदाधिकारी हे शिंदे गटातील आमदारांच्या संपर्कात असून, त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. असे झाल्यास नागपुरात शिवसेनेला मोठा धक्का बसू शकतो. तसेच सध्या शिवसेनेमध्ये असलेले अनेक नेते देखील आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे समर्थक आमदारांकडून करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेची प्रमाणपत्र मोहीम

शिवसेनेकडून सध्या शिवसेना पदाधिकारी, आमदार, नगरसेवकांकडून एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र घेण्यात येत आहे. हे प्रमाणपत्र प्रत्येक शिवसैनिकांकडून घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये माझा ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास असून, मी शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे लिहून द्यावे लागणार आहे. ही मोहीम सुरू असतानाच दुसरीकडे मात्र नागपूरमधील शिवसैनिक हे एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत आहेत. या पदाधिकाऱ्यांनी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर देखील अनेक आरोप केले आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.