Nana Patole : जी-23 हा मोदी शाहांचा ट्रॅप, नाना पटोले यांचा केंद्र सरकारला टोला
जी 23 हा ट्रॅप आहे, विशेष म्हणजे मोदी आणि शहांचा हा ट्रॅप आहे. मी राजीनामा दिला त्या दिवशी बंगल्याची लाईट पाण्याचं कनेक्शन तातडीने कापण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून मोदी (Narendra Modi) आणि शहांची (Amit Shah) राजकारणात अधिक चर्चा आहे. त्याचबरोबर देशात अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरती टीका केली जात आहे. भारत जोडो यात्रेच्या नियोजनासंदर्भात आज दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीसाठी नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे ही यात्रा संपु्र्ण देशात काढण्यात येणार असून त्या माध्यमातून सध्याचं सरकार कसं चुकीच्या पध्दतीने काम करीत आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. भारत जोडो ही यात्रा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यामध्ये 18 दिवस महाराष्ट्रात असणार आहे अशी माहिती आज बैठकीनंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली.
भाजपच्या काळात लोकशाही संपुष्टात आली
राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत अशी देशातल्या अनेक नेत्यांची इच्छा असल्याचे नाना पटोले यांनी जाहीरपणे सांगितले. तसेच ते होतील असा देखील विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. मागच्या दोन दिवसांपुर्वी गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेसच्या नेतृत्वावरती पृथ्वीराज चव्हाण यांनी शंका व्यक्त केली होती. तसेच त्यांनी यापुर्वी आम्ही देखील पत्र दिलं होतं असं वक्तव्य केलं होतं. त्याला नाना पटोले यांनी उत्तर दिलं. कॉंग्रेसमध्ये पक्षामध्ये लोकशाही आहे. प्रत्येकाला मत ठरविण्याचा अधिकार आहे. सध्या सत्तेत असलेल्या भाजपामधील लोकशाही संपुष्टात आली आहे. कोणत्याही माध्यमांमधून भूमिका मांडण्याने पक्षाचं नुकसान होत आहे. ज्या नेत्यांना त्यांची भूमिका मांडायची आहे त्यांनी त्यांची भूमिका पक्ष नेतृत्वाकडे मांडावी. तसेच सार्वजनिकरित्या कोणतीही भूमिका मांडू नये असं उत्तर त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना दिलं.
राजीनामा दिल्यानंतर माझ्या बंगल्याची लाईट गायब झाली
जी 23 हा ट्रॅप आहे, विशेष म्हणजे मोदी आणि शहांचा हा ट्रॅप आहे. मी राजीनामा दिला त्या दिवशी बंगल्याची लाईट पाण्याचं कनेक्शन तातडीने कापण्यात आलं आहे. वर्षभरापासून गुलाब नबी आझाद यांना कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना सर्व सेवा पुरवल्या जात आहेत असंही पटोले यांनी आवर्जुन सांगितलं. भाजप कॉंग्रेसमध्ये जी 23 हा ट्रॅप आहे. आता उघडकीस यायला सुरुवात झाली आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी गब्बर सिंग टॅक्समुळे देश कसा आर्थिक ढासळेलं असं वक्तव्य केलं होतं.