मोदी सरकारला जनतेने देश विकायला सत्तेवर आणलं नव्हतं : नाना पटोले

काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारताना मोदी सरकारला जोरदाल लक्ष्य केलंय.

मोदी सरकारला जनतेने देश विकायला सत्तेवर आणलं नव्हतं : नाना पटोले
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 8:15 PM

मुंबई : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारताना मोदी सरकारला जोरदाल लक्ष्य केलंय. “अर्थसंकल्पात देशातील संपत्ती विकून 1 लाख 95 हजार कोटी रुपये उभारणार असल्याचं मोदी सरकारने सांगितलं. यासाठी त्यांनी मुंबईची आणि देशाची शान असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनही विकायला काढलं. मोदी सरकारला जनतेने देश विकायला सत्तेवर आणलं नव्हतं,” असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं (Nana Patole criticize Modi government in Mumbai August Kranti Maidan).

मोदी सरकार सत्तेत आल्यावर अमित शाह आणि निवडक उद्योगपतींची संपत्ती झपाट्याने वाढली

नाना पटोले म्हणाले, “देशात दवाखाने नाहीयेत, तरी नवी संसद उभारली जातेय. संसद चांगली असतानाही दुसरी इमारत उभारली जातेय. यांचं कामकाज सुरू झालं तेव्हापासून ‘हम दो, हमारे दो’ असं सुरू झालं. अमित शाहांची प्रॉपर्टी झपाट्याने वाढली. ठराविक उद्योगपतीची प्रॉपर्टी लॉकडाऊन काळातही वाढली.”

मोदी सरकारने अनेक जुमले देत जनतेची फसवणूक केली

“काँग्रेस सत्तेत असताना देशात एलआयसी, विमानतळ आणि इतर अनेक गोष्टी उभ्या केल्या. दुसरीकडे भाजपने 2 कोटी लोकांना रोजगार देऊ, 15 लाख खात्यात टाकू असं सांगितलं. मात्र, प्रत्यक्षात त्या फसव्या घोषणा होत्या. देशातील लोकांची मोदी सरकारने अनेक जुमले देऊन फसवणूक केली. स्वामिनाथन आयोग लागू करून शेतमालाला हमीभाव देऊ असं खोटं आश्वासन दिलं. काँग्रेसने स्वामिनाथन समिती बनवली होती, मात्र सत्तांतर होताच भाजपने ते लागू होऊ दिलं नाही आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली,” असंही मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं.

ऑगस्ट क्रांती मैदानावर ‘मोदी सरकार चले जाओ’चा ठराव

नाना पटोले यांनी यावेळी मोदी सरकार चले जाओचा नारा दिला. नाना पटोले म्हणाले, “शेतकरी विरोधी तीन काळे कायदे केले. आजही आंदोलन सुरू असून 200 हून अधिक शेतकरी बांधवांचा आंदोलनादरम्यान मृत्यू झालाय. 6 वर्षात केंद्राने समाजातल्या सर्व घटकांवर अन्याय केलाय. आजच्या बैठकीत ‘मोदी सरकार चले जाओ’ हा ठराव घेण्यात आलाय. लोकशाहीत असा ठराव आणायची वेळ आलीय. या देशाला काँग्रेस विचारांनी मोठं केलं. कष्टानं हा देश उभा केला.”

नाना पटोले म्हणाले, “इंग्रजांसारख्या परकीय शक्तींना पळवून लावण्यासाठी जो आवाज निर्माण झाला तो या मैदानातून तयार झाला. मी खूप नशीबवान आहे. मला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडलं. देशातलं आरएसएसच्या सरकारला पायउतार करण्यासाठी आज ठराव मांडण्यात आलाय. राज्यातील तमाम खेड्यापाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्यात. या सगळ्यांना ताकद देण्यासाठी मी प्रयत्न करेन हा शब्द देतो.”

काँग्रेसतर्फे मांडलेला ठरावाचं नाना पटोलेंकडून वाचन

“नोटबंदी, जीएसटी आणि कोणतीही पूर्वकल्पना नसताना लावण्यात आलेलं लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल झाले. शिवाय कोरोना काळात मजूर आणि इतर लोकांचेही हाल होत असताना केंद्रातील मोदी सरकारने मौन बाळगलं,” असा आरोप नाना पटोले यांनी केला.

मुंबईची आणि देशाची शान असलेलं सीएसएमटीही विकायला काढलं

“अर्थसंकल्पात देशातील प्रॉपर्टी विकून 1 लाख 95 हजार कोटी रुपये उभारणार आहोत असं यांनी सांगितलं. मुंबईची आणि देशाची शान असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनही विकायला काढलं. मोदी सरकारला जनतेने देश विकायला सत्तेवर आणलं नव्हतं,” असंही ते म्हणाले.

हेही वाचा :

मी धडाधड निर्णय घेणाऱ्या दोन नानांना ओळखतो, एक पटोले, दुसरे…. : अशोक चव्हाण

भाजपच्या विखारी प्रचाराला महाराष्ट्र काँग्रेसचे 2 लाख ‘गांधीदूत’ चोख उत्तर देणार : नाना पटोले

इंग्रजही सत्तेतून पायऊतार, देशाचा कारभार चालवणाऱ्या मूठभरांच्या सरकारला खाली खेचणार: नाना पटोले

व्हिडीओ पाहा :

Nana Patole criticize Modi government in Mumbai August Kranti Maidan

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.