नाना पटोले फडणवीसांच्या विरोधात नागपूर दक्षिण-पश्चिममधून शड्डू ठोकणार? आढावा बैठकीत पटोलेंचं मोठं विधान
क्षाने आदेश दिल्यास नागपूर दक्षिण-पश्चिममधून लढेन असं वक्तव्य पटोले यांनी केलं आहे. महत्वाची बाब म्हणजे हा मतदारसंघ विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आहे.
नागपूर : काँग्रेसकडून नागपूर महापालिका निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. महापालिकेतील भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोर लावल्याचं पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पटोले यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आलीय. या बैठकीत बोलताना पटोले यांनी मोठं विधान केलंय. पक्षाने आदेश दिल्यास नागपूर दक्षिण-पश्चिममधून लढेन असं वक्तव्य पटोले यांनी केलं आहे. महत्वाची बाब म्हणजे हा मतदारसंघ विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नाना पटोले देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Nana Patole is preparing to contest against opposition leader Devendra Fadnavis)
भाजपला हादरे देण्याची काँग्रेसची व्यूव्हरचना
पहिल्या दिवशी नागपुरातील तीन विधानसभा मतदारसंघात आढावा बैठकीचं नियोजन करण्यात आलं. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण – पश्चिम मतदारसंघातून नाना पटोले यांनी आढावा बैठकी घ्यायला सुरुवात केली आहे. म्हणजेच राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या मतदारसंघातूनच भाजपला हादरे देण्याची व्यूव्हरचना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आखल्याचं पाहायला मिळत आहे.
नाना पटोलेंचं काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
काँग्रेसने नागपूर महानगरपालिका निवडणूकीची तयारी सुरु केलीय. याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आलीय. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना आणि अडचणी जाणून घेतल्या आणि भाजपला टक्कर देण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश नाना पटोले यांनी दिले.
नाना पटोलेंच्या मार्गदर्शनाला नितीन राऊतांची गैरहजेरी!
यंदा काहीही करुन नागपूर महापालिकेवरचा भाजपचा झेंडा खाली उतरवायचा, असा निश्चय काँग्रेसने केला आहे. आतापासूनच काँग्रेस नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी त्यादृष्टीने कामाला लागले आहेत. त्याच अनुषंगाने आजची महत्त्वाची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलावली. पण या बैठकीला काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते उर्जामंत्री नितीन राऊतांनीच गैरहजेरी लावल्यामुळे दबक्या आवाजात चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळालं.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 24 July 2021https://t.co/CG8BGWFtQW#headlines #Maharashtra #MaharashtraFloods
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 24, 2021
संबंधित बातम्या :
फडणवीसांच्या नागपुरात काँग्रेसच्या जोर बैठका, नाना पटोलेंच्या मार्गदर्शनाला नितीन राऊतांची गैरहजेरी!
Nana Patole is preparing to contest against opposition leader Devendra Fadnavis