Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पक्षानं आदेश दिल्यास नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून लढणार, नाना पटोलेंचे थेट आव्हान

काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीमधून निवडणूक लढण्यास तयार असल्याचं सांगितलंय. (Nana Patole Narendra Modi)

पक्षानं आदेश दिल्यास नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून लढणार, नाना पटोलेंचे थेट आव्हान
नाना पटोले नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 7:12 PM

नागपूर: काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीमधून निवडणूक लढण्यास तयार असल्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारनं लागू केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय हे आंदोलन समाप्त होणार नाही, असं नाना पटोले यावेळी बोलताना म्हणाले. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रश्नाबद्दल बोलताना त्यांनी कोर्टात जाण्याचा इशारा देखील दिला आहे. विधान परिषेदतील राज्यपाल नियुक्त सदस्य हे निवडून दिलेल्या सरकारकडून सूचित केलेले असतात. त्यांची नियुक्ती मुद्दाम अडवून ठेवणे योग्य नाही. हा प्रश्न असाच प्रलंबित राहिल्यास आम्ही न्यायालयात जाऊ, असं वक्तव्य पटोले यांनी केलं आहे. (Nana Patole said he will contest against Narendra Modi )

भाजपमध्ये असताना थेट नरेंद्र मोदी यांना आव्हान देत खासदारकीचा राजीनामा नाना पटोले यांनी दिला होता. आता त्यांनी थेट नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं म्हटलंय. त्यासाठी पक्षानं आदेश देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. विधानपरिषेदच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या प्रश्नी राज्यपालांवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा दबाव आहे का हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.

नवीन जबाबदारी घेऊन तुमच्यासमोर

मी एक वर्ष विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. आता, नवीन जबाबदारी घेऊन मी तुमच्या समोर आलोय. मोदी सरकार कडून जनतेचा भ्रमनिरास झालाय, अशी टीका नाना पटोलेंनी केली. माझी नियुक्ती झाल्यामुळे जनतेत विश्वास निर्माण झालायत्याचा फायदा पक्षाला होईल. आम्ही सामान्य कार्यकर्त्यांसह जनतेसमोर जाऊ त्यांच्या जवळ जाऊन कार्य करू, असंही नाना पटोलेंनी सांगितले.

पक्षविस्ताराची सूट

महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्रितपणे सत्तेत असले तरी प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढविण्याची सूट आहे. काँग्रेसमध्ये गटबाजी आहे म्हणता पण भाजप मध्ये सुद्धा गट आहेत. पदवीधरमध्ये आपण बघितलं की काँग्रेसमध्ये कुठलेही गट नाही म्हणून आम्हाला विजय मिळविता आला. ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे तिथे बॅलटवर निवडणुका घ्यावात, अशा राहुल गांधींच्या सूचना असल्याचं पटोलंनी स्पष्ट केले.

मोदी पंतप्रधान झाले आणि ते पाहिल्यांदा लोकसभेत आले तेव्हा त्यांनी माथा टेकवत त्यांनी गरिबांसाठी काम करणार असल्याचं सांगितलं. मात्र, आता देशात अदानी अंबानी गरीब आहेत का हे वाटायला लागलं असल्याचा टोला नाना पटोलेंनी लगावला. मोदी नौटंकी करतात काल ते राज्यसभेत भावूक झाल्याचं दाखवत होते. मात्र, अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींच्या वेळी ते भावूक झाले नव्हते ते नटसम्राट आहेत, अशी टीका नाना पटोलेंनी केली.

दिल्लीत संगठनात्मक चर्चा झाली मी स्वतः मंत्र्यांच्या आढावा घेईल, आमचे मंत्री चांगलं काम करत आहेत. लाईट बील थोडं तरी कमी व्हावं, अशी आमची अपेक्षा आहे. केंद्रातील तीन कायद्यांविरोधात लोकांना विस्तारपणे सांगणार आहोत. कृषी कायद्यांचं वास्तवजनतेसमोर मांडण्याचा उवक्रम आम्ही लवकरच सुरू करणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं. काँग्रेस नेहमी जनतेबरोबर आहे. जनतेसाठी निर्णय व्हावे हेच आमचे लक्ष आहे, असं पटोलेंनी स्पष्ट केले.

शेतकरी आंदोलनाबद्दल सगळ्या सेलेब्रिटींनी ट्विट केलं ते समान आहे. सुनील शेट्टी यांनी कोणाला टॅग केलं? प्रत्येक जण सारखं लिहू शकत नाही, असंही नाना पटोले म्हणाले.

संबंधित बातम्या:

‘मोदी नटसम्राट! त्यांच्या लेखी अंबानी, अदानीच गरीब’, नाना पटोलेंचा शेलक्या शब्दात टोला

पंतप्रधान मोदींचे अश्रू मगरीचे, राकेश टिकैत यांचे अश्रू दिसत नाहीत का? नाना पटोले आक्रमक

Nana Patole said he will contest against Narendra Modi

हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्...
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्....