यूपीएत काय सुरु आहे यात लक्ष देऊ नका, चंद्रकांतदादा जनतेच्या प्रश्नावर, महागाई,बेरोजगारी वर बोला : नाना पटोले
यूपीएत काय सुरु आहे यात लक्ष देऊ नका,जनतेच्या प्रश्नावर बोला असा पलटवार नाना पटोले (Nana Patole) यांनी चद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर केला आहे.
भंडारा: यूपीएत काय सुरु आहे यात लक्ष देऊ नका,जनतेच्या प्रश्नावर बोला असा पलटवार नाना पटोले (Nana Patole) यांनी चद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर केला आहे. सद्धा यूपीए च्या नेतृत्वा बाबत घमासान सुरु असून कोल्हापुरच्यां पत्रकार परिषदेत यूपीएच्यां बुडत्या जहाज चा कप्तान कोन अशी टीका भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना नाना पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. जनतेच्या प्रश्नावर बोला,महागाई,बेरोजगारी वर बोला,यूपीएत कायय सुरु आहे लक्ष देउ नका असा सल्ला ही त्यांनी दिला आहे. तर दुसरीकडे धार्मिक भावना दुखवून महाराष्ट्रात धार्मिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करतंय असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. रमजान सुरु असतांना जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. या प्रयत्नांचं समर्थन कोणीही करू शकत नाही. राज ठाकरे यांनी अनधिकृत भोंग्या वर कारवाईच्या मागणी नंतर घाटकोपर मध्ये मनसेद्वारे हनुमान चालिसा स्पीकरवर लावण्याचा प्रकार झाला त्यावर नाना बोलले असून जनतेला सर्व समजत असल्याच्या इशारा त्यांनी दिला आहे.
ईडी भाजपची घरगडी आहे ते कधी ही आणू शकतात: नाना पटोले
कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकी संदर्भात महाविकास आघाडीचा पेटीएमचा उपयोग करून मतदारांना पैसे देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला होता. नाना पटोले यांनी कोल्हापूरच्या निवडणुकीत भाजप हारत आहे. भाजप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबद्दल अपमान जनक वक्तव्य केले होते. निवडणुकीत पराभव दिसत असल्यानं अशा प्रकारची वक्तव्य होत असल्याचं नाना पटोले म्हणाले.
बिनबुडाचे बोलायच धर्माच्या नावाने लोंकाना भ्रमित करायचं भाजपचं काम
काँग्रेस हा पक्ष जातीयवाद करतो या चंद्रकांत दादा पाटील यांच्या विधानावर बोलताना नाना पटोले यांनी भाजप वर टीका केली. बिनबुडाचे बोलाच धर्माच्या नावाने लोंकाना भ्रमित करायचे हे काम भाजप करत आहे. हे आता भाजप थांबवल पाहिजे. संताला न माणनारी भाजपची मानसिकता आहे.हिंदू धर्माचा वापर सत्तेसाठी करायचा. कोरोना काळात हिंदूना वाऱ्यावर सोडून दिलं गेलं. गंगा नदीत प्रेत वाहिल्याचा प्रकार आपण पाहिला आहे, अशा प्रकारची टीका नाना पटोले यांनी भाजप वर केली.