काँग्रेसनं अनेकांना जमीन राखायला दिली, त्यांनीच चोरली-डाका मारला, नाना पटोलेंचं शरद पवारांना उत्तर

आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातील जमीनदारांसारखी झाली आहे. त्यांच्याकडील जमीन गेल्या आता फक्त हवेली उरली आहे, असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं. पवारांच्या या टोल्याला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

काँग्रेसनं अनेकांना जमीन राखायला दिली, त्यांनीच चोरली-डाका मारला, नाना पटोलेंचं शरद पवारांना उत्तर
नाना पटोले, शरद पवार
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 6:06 PM

मुंबई : आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातील जमीनदारांसारखी झाली आहे. त्यांच्याकडील जमीन गेल्या आता फक्त हवेली उरली आहे, असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं. पवारांच्या या टोल्याला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसनं अनेकांना जमीनी राखायला दिल्या. त्यांनीच जमीन चोरली, डाका टाकला, अशा शब्दात नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे पवारांवर हल्ला चढवलाय. (Nana Patole’s reply to Sharad Pawar criticizing the Congress leadership)

काँग्रेसनं अनेक लोकांना जमीन राखायला दिली. ज्यांना राखण्यासाठी जमीन दिली त्यांनीच डाका मारला. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असं शरद पवार यांना म्हणायचं असेल, असा टोला पटोले यांनी लगावला आहे. दुसऱ्या पक्षाबद्दल प्रतिक्रिया द्यायला नको. असं म्हणत पटोले यांनी अप्रत्यक्षपणे पवारांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 2024 ला काँग्रेसचाच पंतप्रधान बनणार. कुणाला काय बोलायचं याचं लोकशाहीत स्वातंत्र्य आहे, असंही पटोले टीव्ही 9 शी बोलताना म्हणाले.

‘ज्यांना शक्ती दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला’

काँग्रेस जमीनदारांचा पक्ष नाही. काँग्रेसनं जमीनदारी केली नाही. काँग्रेसनं ज्यांना शक्ती दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला. सामान्य जनता काँग्रेससोबत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तो आम्ही चालू देणार नाही. 2024 मध्ये काँग्रेसच देशाचं नेतृत्व करेल, असा विश्वासही पटोले यांनी यावेळी व्यक्त केलाय. शरद पवार यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली नाही. जमिनदारांचं उदाहरण दिलंय, असंही पटोले म्हणाले.

अप्रत्यक्षपणे पवारांना इशारा

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे शरद पवार हे रिमोट कंट्रोल आहेत. त्यामुळे हे सरकार सुरळीत चालवणे ही त्यांची जबाबदारी आहे. शरद पवार यांनी हे सरकार कसं चालवायचं हे त्यांच्या हातात आहे, असं सांगत पटोले यांनी एकप्रकारे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला इशाराच दिलाय.

शरद पवारांनी नेमकं काय उदाहरण दिलं?

‘उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या हजारो एकर जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. आता त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकदही त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनी आता 15-20 एकरवर आल्या आहेत. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही, असं सांगत पवारांनी काँग्रेसची आजची स्थिती विषद केली.

तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीपुढे काँग्रेसचं मोठं आव्हान?

काँग्रेसची आज दूरवस्था झाली असली तरी हा आजही रिलेव्हन्स असलेला पक्ष आहे. देशभर पसरलेला पक्ष आहे. काँग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात संख्याबळ होतं तेव्हा युपीएसारखा प्रयोग झाला. पण आज काँग्रेसकडे केवळ चाळीसच जागा आहेच, असं पवार म्हणाले. त्यामुळे आजची काँग्रेस हेच तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीपुढचं सगळ्यात मोठं आव्हान असल्याचं पवारांनी एकप्रकारे सांगितलं आहे.

इतर बातम्या :

पहिल्यांदा कोरोना दूर कर, काही लोकांच्या मनातील रोगही दूर कर; भुजबळांचे गणरायाला साकडे

नेता असो वा अभिनेता, घेणं-देणं नाही, गर्दी होऊ देणार नाही, लालबागमध्ये जाऊन नांगरे पाटलांनी ठणकावलं

Nana Patole’s reply to Sharad Pawar criticizing the Congress leadership

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.