अशोक चव्हाणांचे बेरजेचे राजकारण, भाजपचा बडा नेता काँग्रेसमध्ये

बहुजनांचे नेते नागनाथ घिसेवाड यांनी भाजप सोडून काँग्रेस प्रवेश केल्यामुळे भोकरमध्ये पक्षाला स्पर्धकच शिल्लक राहिलेला नाही

अशोक चव्हाणांचे बेरजेचे राजकारण, भाजपचा बडा नेता काँग्रेसमध्ये
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 4:39 PM

नांदेड : भाजप नेते नागनाथ घिसेवाड (Nagnath Ghisewad) यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बहुजनांचे नेते अशी ओळख असलेल्या घिसेवाड यांच्या प्रवेशामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे. (Nanded Bhokar leader Nagnath Ghisewad joins Congress in presence of Ashok Chavan)

भोकर तालुक्यात मोठा जनाधार आणि कार्यकर्त्यांची फौज घिसेवाड यांच्या पाठीशी आहे. येणाऱ्या काळात भोकर नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. घिसेवाड यांच्या पक्षांतरामुळे भोकरमध्ये काँग्रेसला स्पर्धकच शिल्लक राहिलेला नाही.

दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपण भोकरमध्ये पक्ष वाढीचे काम करणार असल्याचं नागनाथ घिसेवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

कोण आहेत नागनाथ घिसेवाड?

नागनाथ घिसेवाड हे नांदेड जिल्ह्यातील लोकप्रिय बहुजन नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. तब्बल दोन वेळा त्यांनी भोकर विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती, दोन्हीही वेळा अत्यल्प मताने त्यांचा पराभव झाला होता.

1999 मध्ये विधानसभा निवडणुकीत तर ते अवघ्या 500 मतांनी पराभूत झाले होते. त्यानंतर 2004 च्या विधानसभेला ते दोन हजार मतांनी मागे पडले. दोन्ही वेळा ते दुसऱ्या क्रमांकावर आले होते. तेव्हापासून बहुजन नेते अशी त्यांची ओळख झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये काम करायला सुरुवात केल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र स्थानिक पातळीवर असणाऱ्या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून ते आता काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.

घिसेवाड यांच्या पक्षप्रवेशाचा काँग्रेसला किती फायदा?

नागनाथ घिसेवाड यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशामुळे या भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्री अशोक चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे. घिसेवाड यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे, ते कार्यकर्ते आता काँग्रेससाठी काम करणार आहेत, त्यामुळे काँग्रेस पक्ष वाढीला मोठी मदत होणार आहे. (Nanded Bhokar leader Nagnath Ghisewad joins Congress in presence of Ashok Chavan)

भोकर तालुक्यापुरता तरी मंत्री चव्हाण यांना कुठलाही ताण घ्यायची गरज पडणार नाही, असे राजकीय विश्लेषक सांगतात. एकूणच मंत्री चव्हाण यांनी विरोधकांना आपलेसे करुन घेऊन सुरु केलेल्या या बेरजेच्या राजकारणामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य पसरलं आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घिसेवाड यांचे जल्लोषात स्वागत

नागनाथ घिसेवाड यांनी मुंबईत जाऊन मंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते आज नांदेडमध्ये परतले. नांदेडला आल्यावर काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात घिसेवाड यांचे जोरदारपणे स्वागत करण्यात आलं. यावेळी काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

संबंधित बातम्या 

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला, अशोक चव्हाणांचा घणाघात

आता भाजपला ताकद दाखवतो, उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी; एकनाथ खडसेंची गर्जना

(Nanded Bhokar leader Nagnath Ghisewad joins Congress in presence of Ashok Chavan)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.