Nanded : ओवेसीच्या दौऱ्यापूर्वीच काँग्रेस एमआयएमचे कार्यकर्ते आपसात भिडले, बॅनर लावण्यावरून झाला वाद

रविवारी एमआयएमचे सर्वेसर्वा असु्द्दीन ओवेसी नांदेड दौऱ्यावर आहेत. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. त्यामुळे एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्याच काम सुरू आहे.

Nanded : ओवेसीच्या दौऱ्यापूर्वीच काँग्रेस एमआयएमचे कार्यकर्ते आपसात भिडले, बॅनर लावण्यावरून झाला वाद
ओवेसीच्या दौऱ्यापुर्वीचं काँग्रेस एमआयएमचे कार्यकर्ते आपसात भिडलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 8:11 AM

नांदेड – नांदेड (Nanded) शहरात रमझान ईदच्या शुभेच्छा बॅनर लावण्यावरून काँग्रेस (Congress) आणि एमआयएमचे (MIM) कार्यकर्ते आपसात भिडले . देगलूर नाका या मुस्लिम बाहुल भागात काँगेस आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यात राडा देखील झाला आहे. ऐनवेळी पोलीस पथक पोहचल्याने अनर्थ टळला आहे . येत्या रविवारी एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी नांदेडला दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागताचे बॅनर लावले जात आहेत. पण देगलूर नाका भागात मुस्लिम नगरसेवकानी ईदच्या शुभेच्छाचे बॅनर लावले आहेत. त्याच ठिकाणी एमआयएमने बॅनर लावण्याचा हट्ट केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती मिळाली आहे. सध्या राज्यात बॅनरमधून एकमेकांना उत्तर द्यायचं प्रमाण अधिक आहे. त्यातून वाद होत असल्याचे पाहायला मिळते. नांदेडमध्ये एकाच ठिकाणी बॅनर लावण्याचा हट्ट असल्याने हा वादचं पोलिसांनी सांगितलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण

रविवारी एमआयएमचे सर्वेसर्वा असु्द्दीन ओवेसी नांदेड दौऱ्यावर आहेत. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. त्यामुळे एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्याच काम सुरू आहे. देगलूर नाका भागात मुस्लिम नगरसेवकानी ईदच्या शुभेच्छाचे बॅनर लावले आहेत. त्याच ठिकाणी एमआयएमच्या कार्यकर्त्यांना बॅनर लावायचा होता. परंतु कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिथं बॅनर लावण्यास विरोध केला. त्यामुळे दोन गटात राडा झाल्याची माहिती मिळाली आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी घटनास्थळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होत. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणात वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. त्यामुळे सध्या नांदेड शहरात अनेक ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त

नांदेडमध्ये राडा झाल्यानंतर तणावपुर्ण शांतता आहे. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रविवारी ओवेसी नांदेडमध्ये असल्याने पोलिसांना कडक बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. राज्यात अनेक दिवसांपासून राजकीय वातावरण अधिक गरम आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोप होत आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.