नांदेड : नांदेडमध्ये आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. हदगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार माधवराव जवळगावकर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर नांदेडमधून विधान परिषदेवरील काँग्रेस आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यावरही उपचार सुरु आहेत. (Nanded Congress MLA Madhavrao Jawalgaonkar Corona Positive)
जवळगावकर यांच्यावर नांदेडमधील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेले जाणार आहे. माधवराव जवळगावकर हे नांदेड काँग्रेसमधील मोठे नेते आहेत. त्यांनी 2019 मधील विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदारकी मिळवली.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
माधवराव जवळगावकर हे नांदेड जिल्ह्यातील चौथे कोरोनाबाधित आमदार ठरले आहेत. याआधी काँग्रेसच्याच तीन आमदारांना कोरोनाची लागण झाली होती.
कोरोना पॉझिटिव्ह आलेले काँग्रेसचे दिग्गज नेते आणि ठाकरे सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच मोहन हंबर्डे यांनी कोरोनावर मात केली आहे. तर विधान परिषदेवरील आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यावरही मुंबईतच उपचार सुरु आहेत.
नांदेडमधील कोरोना पॉझिटिव्ह आलेले आमदार
1) अशोक चव्हाण (भोकर, काँग्रेस ) – कोरोनामुक्त
2) मोहन हंबर्डे (नांदेड दक्षिण, कॉंग्रेस ) – कोरोनामुक्त
3) अमरनाथ राजूरकर (विधानपरिषद, कॉंग्रेस) – उपचार सुरु
4) माधव जवळगावकर (हदगाव, कॉंग्रेस) – उपचार सुरु
अशोक चव्हाण यांना 4 जून रोजी मुंबईतील खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. कोरोनाची लागण झाल्यामुळे चव्हाण यांना 25 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशोक चव्हाण हे लॉकडाऊनच्या काळात दोन महिने नांदेडमध्येच होते.
VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 30 July 2020 https://t.co/LNWxGzOO6G
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 30, 2020