नांदेडमधील नगरपरिषदेत शिवसेनेला लॉटरी, कमी संख्याबळातही नगराध्यक्षपद
भाजपचे चार नगरसेवक फुटल्याने महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आणि नांदेडमधील कुंडलवाडीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा जिट्टेवार यांची वर्णी लागली.
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी नगरपरिषदेत चमत्कारिकरित्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. कुंडलवाडी नगरपरिषदेत शिवसेनेचे सर्वात कमी सदस्य असतानाही नगराध्यक्षपदी सेनेच्या सुरेखा जिट्टेवार विराजमान झाल्या आहेत. (Nanded Kundalwadi Nagar Parishad Shivsena Congress Alliance)
बिलोली तालुक्यात कुंडलवाडी नगर परिषद आहे. या नगरपरिषदेत भाजपचे बहुमत होते. एकूण 17 सदस्यांपैकी भाजपचे सर्वाधिक 10 सदस्य आहेत. त्याखालोखाल काँग्रेसचे 4 सदस्य, तर शिवसेनेचे 3 सदस्य आहेत.
भाजपचे चार नगरसेवक फुटल्याने महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. ऑनलाईन पद्धतीने अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. कुंडलवाडीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा जिट्टेवार यांची वर्णी लागली.
कुंडलवाडी नगर परिषद पक्षीय बलाबल
भाजप – 10 काँग्रेस – 4 शिवसेना – 3
कुंडलवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपला केवळ सहा मते मिळाली, तर शिवसेनेचा 1 सदस्य तटस्थ राहिला. काँग्रेस-शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एकूण दहा मते मिळाली.
नगराध्यक्षपद निवडणुकीत मिळालेली मते
महाविकास आघाडी – 10 भाजप – 6 तटस्थ (शिवसेना) – 1
(Nanded Kundalwadi Nagar Parishad Shivsena Congress Alliance)
विजयी उमेदवाराला मिळालेली मते लक्षात घेतली असता, भाजपचे चार नगरसेवक हे काँग्रेससोबत गेल्याचं दिसतं. आता नांदेड जिल्ह्यात असेच प्रयोग होतील, अशी शक्यता काँग्रेस नेत्यांनी वर्तवली आहे.
Pravin Darekar | स्थायी समितीसाठी कॉंग्रेस, शिवसेनेत चुरस – प्रवीण दरेकर, tv9#pravinDarekar #Congress #Shivsena @ShivSena @INCIndia @NCPspeaks pic.twitter.com/9Zp49Gy5iu
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 1, 2020
संबंधित बातम्या :
शिवसेनेने ‘करुन दाखवलं’, भाजपसोबत निफाडमध्ये युती, सेनेचा सभापती
शिवसेनेने शब्द पाळला, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
(Nanded Kundalwadi Nagar Parishad Shivsena Congress Alliance)