नांदेडमध्ये काय चाललंय? तेलंगणातल्या आमदारांच्या आलिशान गाड्या, ना नंबरप्लेट, ना पोलिसांची धास्ती…

तेलंगणातील या आमदारांचा नांदेडमधला हा प्रवास कसा कुणाच्याच लक्षात येत नाही, असा सवाल उपस्थित होतोय.

नांदेडमध्ये काय चाललंय? तेलंगणातल्या आमदारांच्या आलिशान गाड्या, ना नंबरप्लेट, ना पोलिसांची धास्ती...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 5:09 PM

राजीव गिरी, नांदेडः गेल्या काही दिवसांपासून नांदेडमधल्या राजकीय वातावरणात नव्या घडामोडी घडत आहेत. तेलंगणातील (Telangana) बीआरएस पार्टी (BRS PArty) नांदेडमधून (Nanded) महाराष्ट्रात एंट्रीच्या तयारीत आहेत. त्यामुळे तेलंगणातील आमदार-नेत्यांच्या फेऱ्या नांदेडमध्ये वाढल्या आहेत. हे आमदार येत आहेत, मात्र त्यांच्या गाड्यांना नंबर प्लेटच नाहीयेत. मोठ-मोठ्या आलिशान गाड्या घेऊन हे आमदार सर्रास नांदेडमध्ये फिरतायत. त्यांना कुणाची धास्ती आहे की नाही? नांदेडच्या आरटीओ अधिकाऱ्यांचं याकडे लक्ष आहे की नाही, असा सवाल जनतेतून विचारला जातोय. येत्या 5 फेब्रुवारी रोजी बीआरएस पार्टीची मोठी सभा नांदेडमध्ये होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय. पण या बिना नंबर प्लेटच्या गाड्यांकडे कुणी लक्ष देणार का, हा प्रश्न उपस्थित केला जातोय.

काय घडतंय?

तेलंगणा राज्यातील बीआरस या पक्षाचे चार आमदार मंगळवारी रात्रीपासून नांदेडमध्ये मुक्कामी आहेत. मात्र हे आमदार आणि पक्षाचे लोक चक्क विना नंबरच्या आलिशान गाडीतून फिरतायत. शहरात त्यांच्या विना नंबरच्या गाड्या आणि त्यांचे बॉडीगार्ड पाहून लोक आश्चर्य व्यक्त करतायत. आपल्या देशात राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या शिवाय कुणालाही विना नंबरच्या गाड्या वापरता येत नाही. पण तेलंगणातील या आमदारांचा नांदेडमधला हा प्रवास कसा कुणाच्याच लक्षात येत नाही, असा सवाल उपस्थित होतोय.

राजकीय घडामोडींना वेग

तेलंगणातील बीआर एस पार्टी नांदेडमधून महाराष्ट्रात एंट्री करणार आहे. त्या अनुषंगाने पक्ष वाढीसाठी बी आर एस नेत्यांच्या नांदेडमध्ये गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर येत्या 5 फेब्रुवारी रोजी नांदेड मध्ये सभा घेणार आहेत. तेलंगणाच्या बाहेर मुख्यमंत्री के सी आर यांची ही पहिलीच सभा असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून तेलंगणा राज्यातील चार आमदार नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. आमदार जीवन रेड्डी, बलका सूमन , जोगु रमन्ना , हनुमंत शिंदे असे हे चार आमदार आहेत. नांदेडमधील सभा स्थळांची पाहणी त्यांच्याकडून सुरु आहे.

बीआरएस पार्टी नांदेडमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच येत्या विधानसभा निवडणुका लढणार असल्याचं या आमदारांनी सांगितलंय. नांदेड जिल्ह्यातील सिमावर्ती गावानी तेलंगणात येण्याची इच्छा व्यक्त केली असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांना यायची गरज नाही . तेलंगणातील सुविधा देण्यासाठी आम्हीच महाराष्ट्रात येणार आहोत असं उत्तर त्यांनी दिलंय.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.