एक भाऊ शिवसेना जिल्हाध्यक्ष, दुसरा राष्ट्रवादीचा, महाआघाडीचा वेगळाच पॅटर्न

नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेचे जिल्हाध्यक्षपद विक्रांत मोरे यांच्याकडे आहे. राष्ट्रवादीने त्यांचे भाऊ डॉ. अभिजीत मोरे यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावली आहे

एक भाऊ शिवसेना जिल्हाध्यक्ष, दुसरा राष्ट्रवादीचा, महाआघाडीचा वेगळाच पॅटर्न
Follow us
| Updated on: Sep 24, 2020 | 6:31 PM

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीचा वेगळाच पॅटर्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. दोन सख्खे भाऊ दोन वेगवेगळ्या पक्षांचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना दिसत आहेत. त्यापैकी एक भाऊ आहे शिवसेनेत, तर दुसरा राष्ट्रवादीत. (Nandurbar Brothers elected as District Presidents of Different Parties Shivsena NCP)

एकाच घरात नांदणाऱ्या दोन पक्षांची उदाहरणं महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नाहीत. साताऱ्यातील गोरे भावंडं असूदेत किंवा बीडमधील क्षीरसागर काका-पुतणे. अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे चुलत बंधू राज ठाकरे हे राज्यातील दोन राजकीय पक्षांचे प्रमुख. मात्र अशा वेळी नातेसंबंध दुरावल्यामुळे दुसऱ्या पक्षाची वाट धरलेली असते, किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याने नात्यात फूट पडल्याचे पाहायला मिळते. नंदुरबारमध्ये मात्र मोरे भावंडांनी एकोप्याने एकाच घरात राहत दोन पक्षांचे झेंडे खांद्यावर धरले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेचे जिल्हाध्यक्षपद विक्रांत मोरे यांच्याकडे आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रांत मोरे यांचे भाऊ डॉ. अभिजीत मोरे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून वर्णी लावली आहे. महाविकास आघाडीचा हा नवीन पॅटर्न अभावानेच कुठे दिसून येत असेल.

हे दोन्ही भाऊ एकाच घरात राहतात, अशा वेळेस हे दोघं भाऊ एकाच घरात राहून दोन वेगवेगळ्या पक्षांचा विस्तार कसा करु शकतील? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे.

एकाच घरात राहणारे दोन भाऊ दोन वेगवेगळ्या पक्षांचे जिल्हाप्रमुख असून झाले असून, त्यांच्या पक्ष विस्ताराचे काम ते नेमकं कसं पार पाडतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. एक मात्र निश्चित आहे, या दोघांना स्वतंत्र वाट चालत असताना संघर्ष हा निकराचा करावा लागणार आहे.

संबंधित बातम्या :

दोन पक्षांची युती, मात्र सख्खे भाऊ पक्के वैरी, जयकुमार वि. शेखर गोरे एकमेकांविरोधात उभे!

(Nandurbar Brothers elected as District Presidents of Different Parties Shivsena NCP)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.