नारायण राणे यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी, लिलावतीमध्ये उपचार, आता तब्येत कशी आहे? वाचा सविस्तर…

मुंबई : केंद्रीय सुक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) ही शस्त्रक्रिया पार पडली. सध्या नारायण राणे यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत रूग्णालयाकडून माहिती देण्यात आली आहे. नारायण राणेंवर शस्रक्रिया केंद्रीय सुक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात […]

नारायण राणे यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी, लिलावतीमध्ये उपचार, आता तब्येत कशी आहे? वाचा सविस्तर...
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 1:47 PM

मुंबई : केंद्रीय सुक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) ही शस्त्रक्रिया पार पडली. सध्या नारायण राणे यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत रूग्णालयाकडून माहिती देण्यात आली आहे.

नारायण राणेंवर शस्रक्रिया

केंद्रीय सुक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली.

तब्येत कशी आहे?

नारायण राणे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयात गेले होते. यावेळी त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांमध्ये ब्लॉक असल्याचं दिसलं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांची प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना अॅन्जिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. अॅन्जिओप्लास्टीनंतर आता त्यांना आणखी तीन चे चार दिवस रुग्णालयात ठेवलं जाणार असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. नारायण राणे त्यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांना कोणताही त्रास होत नाही.

नारायण राणे यांना दोन स्टेंट्सची म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्या आणि रक्तवाहिन्या दाबल्या जाऊ नये म्हणून बसवला जाणाऱ्या जाळीसारख्या छोटा गोलाकार तुकड्याची गरज आहे. अॅन्जिओप्लास्टी करून ती बसवण्यात आली. यात स्टेंट बसवण्यात आलं, तर दुसरा स्टेंट नंतर बसवण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

नारायण राणेंवर याआधीही अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. 2009 मध्ये रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे नारायण राणेंच्या छातीत दुखत होतं. त्यावेळी त्यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. ती शस्त्रक्रिया देखील लिलावती रुग्णालयातच करण्यात आली होती.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.