Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप नगरसेवकाला काळं फासणाऱ्या शिवसैनिकांना अटक आणि जामीनावर सुटका, न्यायालयाबाहेरच सत्कार!

उल्हासनगरात शिवसेनेनं भाजपचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. रामचंदानी यांना मारहाण करण्यात आली होती तसंच त्यांना काळ फासण्यात आलं होतं. रामचंदानी हे सातत्यानं शिवसेनेच्या विरोधात बोलत असल्याच्या रागातून त्यांना धडा शिकवल्याचं शिवसेनेनं सांगितलं होतं.

भाजप नगरसेवकाला काळं फासणाऱ्या शिवसैनिकांना अटक आणि जामीनावर सुटका, न्यायालयाबाहेरच सत्कार!
उल्हासनगरमध्ये भाजप नगरसेवकाला शिवसैनिकांकडून मारहाण
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 8:41 PM

उल्हासनगर : भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी (Pradeep Ramchandani) यांना काळं फासणाऱ्या शिवसैनिकांपैकी 5 जणांना अटक करून त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. उल्हासनगर न्यायालयानं प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर या पाच जणांची सुटका केलीय. एकीकडे राज्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात शिवसेनेची आंदोलनं सुरू असताना दुसरीकडे उल्हासनगरात शिवसेनेनं भाजपचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. रामचंदानी यांना मारहाण करण्यात आली होती तसंच त्यांना काळ फासण्यात आलं होतं. रामचंदानी हे सातत्यानं शिवसेनेच्या विरोधात बोलत असल्याच्या रागातून त्यांना धडा शिकवल्याचं शिवसेनेनं सांगितलं होतं. (Bail granted to ShivSena activists who beat up BJP corporator Pradip Ramchandani)

रामचंदानी यांना मारहाण प्रकरणात शिवसेनेच्या 8 ते 10 कार्यकर्त्यांच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापैकी ज्ञानेश्वर मरसाळे, हरीश खेत्रे, महेंद्र पाटील, विनोद साळेकर आणि मोहम्मद हुसेन अब्दुल रज्जाक शेख या पाच जणांना बुधवारी रात्री अटक करण्यात आली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता या सर्वांना प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर शिवसेनेनं न्यायालयाच्या बाहेरच या पाचही शिवसैनिकांचा सत्कार केला. यावेळी आम्हाला आमच्या कृत्याचा कुठलाही पश्चात्ताप नाही तर आनंदच असल्याचं सुटका झालेल्या शिवसैनिकांनी म्हटलंय. यापुढे सुद्धा जर कुणी शिवसेनेच्या विरोधात बोललं, तर त्याला याच पद्धतीने उत्तर देऊ, असा इशारा यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि माजी सभागृह नेते धनंजय बोडारे यांनी दिलाय.

तोंडाला काळं फासत मारहाण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आलं होतं. राणे यांच्याविरोधात संपूर्ण राज्यभरात असंतोषाचं वातावरण असताना उल्हासनगरात मोठी घटना घडली होती. नारायण राणे यांना अटक झालेली असताना शिवसेनेविरोधात बोलणाऱ्या भाजपा नगरसेवकाला शिवसैनिकांनी थेट काळं फासत मारहाण केली. या घटनेनंतर उल्हासनगर शहरात मोठी खळबळ उडाली होती. प्रदीप रामचंदानी हे उल्हासनगर महानगरपालिकेचे स्वीकृत सदस्य आहेत.

भाजप नगरसेवकावर 10 जणांचा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार रामचंदानी हे 24 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उल्हासनगर महानगरपालिकेच्या बाहेर आले होते. यावेळी अचानक 8 ते 10 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांना खाली पाडून मारहाण केली. या मारहाणीनंतर रामचंदानी यांच्या तोंडाला काळं फासलं. मारहाण करण्यासाठी आलेले कार्यकर्ते गळ्यात शिवसेनेचे मफलर घालून आल्याचं सांगण्यात येतंय. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये हा सर्व घटनाक्रम स्पष्टपणे दिसतोय.

इतर बातम्या :

अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीचे नेते 1 सप्टेंबरला राज्यपालांना भेटणार, 12 आमदार नियुक्तीचा तिढा सुटणार?

महाविकास आघाडीचे नेते म्हणतात वेळ दिली नाही, राजभवन म्हणतं वेळ मागितलाच नाही! नेमकं काय सुरु?

Bail granted to ShivSena activists who beat up BJP corporator Pradip Ramchandani

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.