Breaking : खासदार विनायक राऊतांच्या घरावर अज्ञातांनी सोडा बॉटल फेकल्या! बाईकवरुन आलेले चौघे पळून जाण्यात यशस्वी

राणेंवरील कारवाईचं जोरदार समर्थन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे. त्यानंतर आता विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील घरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आलाय. चार अज्ञात बाईकस्वारांनी विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील तळगाव इथल्या बंगल्यावर सोडा बॉटल फेकल्याची माहिती मिळतेय.

Breaking : खासदार विनायक राऊतांच्या घरावर अज्ञातांनी सोडा बॉटल फेकल्या! बाईकवरुन आलेले चौघे पळून जाण्यात यशस्वी
विनायक राऊत
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 10:05 PM

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईचं जोरदार समर्थन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे. त्यानंतर आता विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील घरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आलाय. चार अज्ञात बाईकस्वारांनी विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील तळगाव इथल्या बंगल्यावर सोडा बॉटल फेकल्याची माहिती मिळतेय. सोडा बॉटल फेकल्यानंतर हे चौघेही पळून जाण्यात यशस्वी ठरल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या हल्ल्यात राऊत यांच्या बंगल्याचं कुठलंही नुकसान झालेलं नाही. (Unidentified persons threw soda bottles at ShivSena MP Vinayak Raut’s bungalow )

विनायक राऊतांची पंतप्रधानांकडे तक्रार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. त्यावरुन खासदार विनायक राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. राऊत यांनी एक पत्र पंतप्रधान मोदींना पाठवलं आहे. “केंद्रीय मंत्रीपदावर असलेल्या नारायण राणे यांचं अशाप्रकारचं वर्तन मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिलं. मला अभिमान वाटतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अवघ्या 10 मिनिटांत त्या पत्राची दखल घेतली. दुपारी 2 वाजून 26 मिनिटांनी त्यांच्या कार्यालयातून मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं की पंतप्रधान मोदी आता एका बैठकीत आहेत, तुम्ही गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्या. त्यांच्याकडे मी तुमच्या तक्रारीचं पत्र पाठवलं आहे, असं उत्तर मला अवघ्या 10 मिनिटांत मिळालं. पण मला सांगायचं आहे की, राणे यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी”, अशा शब्दात विनायक राऊत यांनी राणेंवर हल्ला चढवलाय.

‘पोलिसांवर कुठलाही दबाव नाही’

“महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास आहे. मुंबई, महाराष्ट्रातील पोलीस कायद्याच्या बाहेर जाऊन काही काम करत नाहीत. नारायण राणे यांना जी अटक झालेली आहे ती संविधानाप्रमाणेच आहे. पोलिसांवर कुठलाही दबाव नाही. पोलीस कायद्याचे रक्षणकर्ते आहेत आणि त्यांनी कायद्याचं रक्षण केलेलं आहे. राज्यातील वातावरण चिघळण्याचा प्रश्न येत नाही. करावं तसं भरावं. वातावरण चिघळवण्याची सुरुवातच नारायण राणे यांनी केली आहे. त्यामुळे त्यांना अटकाव बसण्याची आवश्यकता होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुविचारी वृत्तीचे, सज्जन प्रवृत्तीचे आणि लोकांच्या विकासाचा ध्यस घेतलेले आहेत. त्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं पण जे कायद्याचे रक्षणकर्ते आहेत, त्यांनी याची गंभीर दखल घेऊन अटक केली आहे. यावरुन वातावरण चिघळणार असेल तर त्याची जबाबदारी ही सर्वस्वी भाजपची असेल”, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिलाय.

संबंधित बातम्या :

नारायण राणेंना अटक, अनिल परबांचा व्हिडीओ उजेडात; आता भाजप नेत्यांचा शिवसेनेला इशारा

EXCLUSIVE : नारायण राणेंच्या अटकेची इनसाईड स्टोरी, अनिल परब सतत पोलिसांच्या संपर्कात, अटकेसाठी दबाव?

Unidentified persons threw soda bottles at ShivSena MP Vinayak Raut’s bungalow

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.