… तर संजय राऊत यांची जीभ कापून टाकू : नारायण राणे
भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे (Narayan Rane criticize Sanjay Raut).
मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे (Narayan Rane criticize Sanjay Raut). छत्रपती आमचं दैवत आहे. यापुढे संजय राऊत छत्रपतींच्या वंशजांबद्दल काहीही वेडंवाकडं बोलले, तर त्यांची जीभ जागेवर राहणार नाही, असा इशारा नारायण राणेंनी दिला. यावेळी राणेंनी संजय राऊत यांना सत्तेचा माज चढल्याचा आरोप करत त्याची जीभ फार चालत आहे, असंही म्हटलं (Narayan Rane criticize Sanjay Raut).
नारायण राणे म्हणाले, “संजय राऊत यांना सत्तेचा माज चढला आहे. त्यामुळे त्यांची जीभ खूप चालत आहे. आता यापुढे ते छत्रपतींच्या वंशजांबद्दल काहीही वेडंवाकडं बोलले, तर त्यांची जीभ जागेवर राहणार नाही. संजय राऊतांच्या भावाला मंत्रिपद मिळालं नाही. तेव्हापासून राऊत अशी वक्तव्यं करत आहेत. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे.”
राणेंनी शिवसेनेवर सत्तेसाठी तडजोड केल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, “महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि सरकार अस्तित्वात आलं असं म्हणतात. मात्र, तसं झाल्याचं अजून जाणवत नाही. या सरकारने काढलेल्या कर्जमाफीच्या जीआरमध्ये तारीख नाही, खर्चाची माहिती नाही, लाभार्थींची माहिती नाही. यांच्या कर्जमाफीचा निर्णय म्हणजे फकीर घोषणा आहे.”
आघाडीच्या सरकारमध्ये आठवडी बाजारानुसार आठवड्याला मंत्री येतात आणि रात्री निघून जातात. हे ‘आठवडी बाजार सरकार’ आहे. एकही लोकहिताचा निर्णय अद्याप झालेला नाही, असंही राणे म्हणाले.
इंदिरा गांधींबद्दल संजय राऊत यांनी केलेलं विधान त्यांनी आता मागे घेतलं असलं तरी लोक हे वक्तव्य विसरणार आहेत का? असाही सवाल राणेंनी केला. तसेच संजय राऊत जे बोलले त्याची नैतिक जबाबदारी उद्धव ठाकरेंची असल्याचंही सांगितलं. यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असंही राणे म्हणाले.
‘संजय राऊत आणि दाऊद यांच्या संबंधांची चौकशी करा’
नारायण राणे यांनी संजय राऊत आणि दाऊद इब्राहिम यांच्या संबंधांची गृह विभागाने चौकशी करावी, असी मागणीही केली. ते म्हणाले, “संजय राऊत दाऊदशी बोलायचे असं ते स्वतः सांगतात. नंतर ते म्हणाले की दाऊदला त्यांनी दमही दिला. त्यामुळे संजय राऊत यांच्या व्यक्तव्याबद्दल गृह विभागाने त्यांची चौकशी केली पाहिजे.”
संबंधित बातम्या:
संजय राऊतांची माघार, इंदिरा गांधी-करीम लाला भेटीविषयीचं वक्तव्य मागे
“संजय राऊत यांचं वक्तव्य चुकीचं, भविष्यात अशा गोष्टी खपवून घेणार नाही”
संभाजी भिडेंकडून सांगली बंदची हाक, उद्याच मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा
इंदिराजींबद्दल कोणताही शिवसैनिक अपशब्द काढणार नाही : आदित्य ठाकरे