Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narayan Rane : ‘आमदारांनी गद्दारी नाही केली, तर शिवसेनेशी या माणसाने गद्दारी केली’ – नारायण राणे

नारायण राणे यांनी शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांना गद्दार म्हणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवर देखील जोरदार टीका केली.

Narayan Rane : 'आमदारांनी गद्दारी नाही केली, तर शिवसेनेशी या माणसाने गद्दारी केली' - नारायण राणे
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 2:06 PM

मुंबई : भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी अनेकदा शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केलेली नाही. शिवसेनेशी गद्दारी केली ती उद्धव  ठाकरे यांनी असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

नेमंक काय म्हटलं राणेंनी ?

नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केली नाही. पक्षाशी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केल्याचं राणे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सारख्या कडवट शिवसैनिकाशी गद्दारी केली. पक्षातील आमदारांना कधीच सहकार्य केले नाही. जे काम केलं ते फक्त नातेवाईक आणि मोतश्रीसाठी केल्याची टीका राणे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

भाजप आणि जनतेशी गद्दारी करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले असंही राणे यांनी म्हटलं आहे. आता राणे यांच्या टीकेला  उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेला गळती सुरूच

दरम्यान दुसरीकडे शिवसेनेला सोडून शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्या वाढतच आहे. आता नाशिकमध्ये शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.

युवासेनेचे राज्य विस्तारक अजिंक्य चुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. त्यांनी वरून सरदेसाई यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला.

अजिंक्य चुंबळे यांना वरून सरदेसाई यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मात्र त्यांनी आज सरदेसाई यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. अजिंक्य चुंबळे यांचे वडील शिवाजी चुंबळे आणि आई कल्पना चुंबळे हे देखील सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करायच्या  तयारीत असल्याची चर्चा आहे.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.