नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंची औकात काढली
उद्धव ठाकरे जगातील ढ माणूस. उद्धव ठाकरे हा मानसिकता हरवलेला माणूस. उद्धव ठाकरे आयत्या बिळावरचा नागोबा. पदासाठी, पैशासाठी, हिंदूत्वाकडे दुर्लक्ष केले.
संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : भाजप नेते आणि केंद्रीय नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यावर यांच्यावर गंभीर टीका केली आहे. नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंची औकात काढली आहे. हिंदूत्व, महाराष्ट्र आणि मुंबईचा पुळका आहे असं दाखवणाऱ्या उद्ध ठाकरें फक्त खोट बोलता येते. टीका करताना राणेंनी उद्धव ठाकरेंचा थेट एकेरी भाषेत उल्लेख केला.
आता गटप्रमुख आठवले का? अडीच वर्षे सत्ता असताना किती गटनेत्यांना भेटला? उचलली जीभ लावली टाळ्याला. मुंबई वर गिधाड फिरत आहेत, कुणाला गिधाड म्हणता? अमित शहांना गिधाड म्हणता. चांगले शब्द नाहीत का ? औकात आहे का तुझी ? असं नारायण राणे म्हणाले.
मुंबई महापालिकेत कोण किती टक्का देत होता. मुंबई जागतिक कीर्तीचं शहर. पण काय स्थिती आहे मुंबईची. मात्रभूमीसाठी उद्धव ठाकरेने काय केले? मुंबईत राहणाऱ्या जनतेसाठी त्यांच्या कल्याणासाठी गरिबांसाठी आणि मुंबई दोन लाख भिकारी आहे त्यांच्यासाठी काय योजना आणल्यात का?
उद्धव ठाकरे जगातील ढ माणूस. उद्धव ठाकरे हा मानसिकता हरवलेला माणूस. उद्धव ठाकरे आयत्या बिळावरचा नागोबा. पदासाठी, पैशासाठी, हिंदूत्वाकडे दुर्लक्ष केले.
बहिणीचे महत्व उद्धव ठाकरेंना माहीत नाही. असे म्हणत नारायण राणेंनी खासदार भावना गवळी यांची बाजू घेतली आहे. खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाराचाराचे आरोप झाले. यानंतर आता त्यांना क्लिन चीट दिली जात आहे. मला पंतप्रधानाचे आश्चर्य वाटते, ज्या बाईवर आरोप केले तिच बाई मिळाली का तुम्हाला राखी बांधायला, असा सवाल उद्धव यांनी उफस्थित केला होता.
निवडणुका घेण्याचे उद्धव ठाकरेंचे आव्हान बालिशपणाचे पक्ष वाढवण्यासाठी कझी संघर्ष केला आहे. भाजप नेत्यांच्या केसालाही धक्का लागला तर राज्यात फिरु देणार असा नारायाण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. उद्धव ठाकरेंना तोंड बंद करावं असा सल्लाही राणेंनी दिला.