विनायक राऊत पडल्यात जमा; शहाजीबापू पाटील यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नारायण राणे यांची प्रतिक्रिया
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. रविवारी शिंदे गटाचे नेते आमदार शहाजीबापू पाटील हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी दोन राऊतांनी मिळून शिवसेनेची वाट लावली असं वस्तव्य केलं होतं. तसेच विनायक राऊत यांना पाडण्यासाठी निलेश राणे (Nilesh rane) यांनी पुढे यावं, आपण 2024 ला मैदानात उतरू असं देखील शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं होतं. शहाजीबापू पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी विनायक राऊत यांना टोल लगावला आहे. विनाय राऊत यांना पाडण्यासाठी फार मोठी ताकद लागेल असं नाही, ते पडल्यात जमा असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे.
राणे यांनी नेमकं काय म्हटलं?
विनायक राऊत यांना पाडण्यासाठी निलेश राणे यांनी पुढे यावं, 2024 ला आमण मैदानात उतरू असं शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं होतं. शहाजीबापू पाटील यांच्या वक्तव्यावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शहाजीबापू जे बोलले ते त्यांच मत होतं, मतावर काय बोलणार? पण विनायक राऊत यांना पाडण्यासाठी फार मोठ्या ताकदीची गरज नाही. ते पडल्यात जमा असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंना टोला
दरम्यान यावेळी बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे. आत्महत्या करणाऱ्याला त्याचं वाईट वाटत नसते कारण तो स्व:त आत्महत्या करत असतो. तशीच राजकीय आत्महत्या उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे वाईट वाटण्याचे कारण नाही, असं राणे यांनी म्हटलं आहे.