नारायण राणे ‘शिवतीर्थ’वर, राज ठाकरे यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली

नारायण राणे 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 31, 2022 | 2:28 PM

मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे (Raj Thacheray) यांच्या दादरमधील शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर या राणे आणि ठाकरे भेटीला विशेष महत्व आहे.

मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये जवळीक वाढत आहे. भाजप नेते वारंवार राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. आता नारायण राणे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

काहीवेळा आधी नारायण राणे ‘शिवतीर्थ’वर दाखल झाले. तिथे राज ठाकरे आणि त्यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीवेळी राज ठाकरे आणि नारायण राणे हे ‘शिवतीर्थ’च्या गॅलरीत पाहायला मिळाले.

नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यातील ही भेट वैयक्तिक आहे. यात कौटुंबिक मुद्यावर चर्चा झाली असं सांगण्यात येत आहे.

ही भेट वैयक्तिक कारणासाठी घेण्यात येतेय, असं जरी सांगण्यात येत असेल तरी दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा त्यांच्यात राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणं सहाजिक आहे. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.

मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. अशात शिवसेना ठाकरे गटाला टक्कर द्यायची असेल तर तितकंच राजकीय बळ लावावं लागणार आहे. त्यामुळे युतीत विविध पक्षांचा समावेश करण्यासाठी हालचाली वाढत असल्याचं बोललं जात आहे. अशात राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या भेटीला विशेष महत्व आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.