नारायण राणे, नितेश राणे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार, दिशा सॅलियनच्या पालकांची तक्रार

दिशा सॅलियनची बलात्कार करून हत्या केली, असा आरोप राणेंकडून करण्यात येत आहे. त्यावरून शिवसेनाही आक्रमक झाली आहे. तसेच दिशा सॅलियनच्या पालकांनी राणेंविरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे आता दिडोशी न्यायालयात नारायण राणे आणि नितेश राणे हे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार आहेत. मालवणी पोलीस ठाण्यात ही तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.

नारायण राणे, नितेश राणे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार, दिशा सॅलियनच्या पालकांची तक्रार
राणे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 10:16 PM

मुंबई : राज्यात राणे (Narayan Rane) विरुद्ध शिवसेना (Shivsena) संघर्ष हा कायमचा आहे. आधी मुख्यमंत्र्यांबाबत वक्तव्य केल्याने नारायण राणेंना अटक झाली. त्यानंतर शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना अटक झाली. ही प्रकरण शांत होत होती. तोवर आता एका नव्या प्रकरणात राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण दिशा सॅलियनची बलात्कार (Disha Salian Case) करून हत्या केली, असा आरोप राणेंकडून करण्यात येत आहे. त्यावरून शिवसेनाही आक्रमक झाली आहे. तसेच दिशा सॅलियनच्या पालकांनी राणेंविरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे आता दिडोशी न्यायालयात नारायण राणे आणि नितेश राणे हे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार आहेत. मालवणी पोलीस ठाण्यात ही तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.

राणेंच्या आरोपांमुळे बदनामी झाल्याचा आरोप

नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या परत परत आरोप करण्यामुळे दिशा सॅलियनची मृत्युनंतर बदनामी होत आहे, असा आरोप शिवसेनेकडून सतत करण्यात येत आहे. शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत महिला आयोगाकडेही तक्रार केली आहे. त्यावरून भाजप आणि शिवसेनेत अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. याबाबत दिशा सॅलियनच्या पालकांनीही माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली होती. आणि दिशाची बदनामी थांबवण्याची विनंती केली होती. राज्य महिला आयोगानेही याबाबत तातडीने पाऊलं उचलत पोलिसांना याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. हे प्रकरण आता पुन्हा तापताना दिसतंय. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणही देशभर चर्चेत होतं. या दोन्ही प्रकरणावरून नारायणे राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यावरून आता शिवसेनाही आक्रमक झाली आहे.

आरोप राणेंना भोवणार?

राणे पितापुत्रांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली आहे. ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. तसेच आमच्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहनही केलं होतं. त्यानंतर सालियन कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडून दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा अहवाल मागितला होता. त्यामुळे हे प्रकरण राणेंना भोवणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Video: फॉरेस्टवाले इतके निक्कमे आहेत, नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना झापलं, नेमकं कारण काय?

Nana Patole | …तर नवाब मलिक यांना खूर्चीवर राहण्याचा अधिकार नाही : नाना पटोले

आरक्षणाच्या मुद्यावर चारही पक्षांकडून फसवणूक,देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांनी रडण्याचं नाटक करु नये : प्रकाश आंबेडकर

'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.