Narayan Rane : ‘नारायण राणे यांची किंमत आजच्या घडीला चाराण्याचीच’
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फोटो 25 पैशांच्या नाण्यावर लावण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणे यांची किंमत आताच्या घडीला चाराण्याचीच आहे, असं ते म्हणाले आहेत. नारायण राणे यांचा 25 पैशांच्या नाणेवरचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर दानवे यांनी या फायरल फोटोचा संदर्भ देत राणेंवर निशाणा साधला आहे. ते मुंबईत (Mumbai) पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी अंबादास दानवे यांनी नारायण राणे यांच्यासोबत अब्दुल सत्तार आणि चंद्रकात पाटील यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरेंनी आपल्या मतदारसंघात यावं म्हणून जे आधी वाट बघत होते, आता तेच सत्तार टीका करत असल्याचंही दानवे यांनी म्हटलं. तर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं.
पाहा व्हिडीओ :
शिवसेना 2.0 या फेसबुक पेजवरुन एक पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फोटो हा 25 पैशांच्या नाण्यावर लावण्यात आला होता. ‘हे फायनल करा’ असं फोटोच्या वर लिहून ‘ठरलं तर मग’ अशी पोस्ट टाकण्यात आलेली होती.
नारायण राणे यांच्या फोटोबाबतची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर या प्रकरणी भाजप तर्फे सिंधुदुर्ग पोलिसांत गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता. नारायण राणेंच्या फोटो एडीट करुन खोडसाळपणा करणाऱ्यांवर संविनाधाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी नोटेवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो लावावा, असं वक्तव्य दोन दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर नोटेवर कुणाचा फोटो असावा आणि नसावा, यावरुन राजकीय प्रतिक्रियांना ऊत आला आहे. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या व्हारल झालेल्या 25 पैशांच्या नाण्याच्या फोटोनेही सगळ्यांचं लक्ष वेधलंय.