Narayan Rane Press Conference : ‘ईडीवर बोलू नको, बीडी प्यायला लावतील’, राणेंच्या वक्तव्यावर गंभीर वातावरणही मोकळं झालं

राऊतांच्या आरोपांना आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. सुधीर मुनगंटीवार आणि मोहित कंबोज यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार हल्ला चढवला.

Narayan Rane Press Conference : 'ईडीवर बोलू नको, बीडी प्यायला लावतील', राणेंच्या वक्तव्यावर गंभीर वातावरणही मोकळं झालं
नारायण राणे आणि संजय राऊत
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 4:53 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. इतकंच नाही तर राऊतांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya), मोहित कंबोज आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांच्या आरोपांना आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. सुधीर मुनगंटीवार आणि मोहित कंबोज यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. हाच धागा पकडत ईडीवर बोलू नको, विडी प्यायला लावतील, असा जोरदार टोला राणेंनी लगावला आहे.

‘आम्ही शिवसेनेसाठी वाटा दिला, तू 5 पैसे तरी दिले का?’

नारायण राणे म्हणाले की, ‘विकासावर बोला, ते बोलत नाही हा माणूस. जनतेच्या प्रश्नाचे विषय, आरोग्य खात्याच्या प्रश्नाबद्दल वृत्तपत्रांनी बातमी दिली, राज्याचा आरोग्यविभाग निधीअभावी अत्यवस्थ, अरे यावर काहीतरी बोल, राज्याची दयनीय अवस्था, प्रश्न सुटत नाही, एसटीचं आंदोलन सुरु आहे. पण काही नाही, इंडस्ट्री मिनीस्टर पत्राचाळीतून बंगल्यात गेले. कंबोजने सांगितलं, चेक दिला संजय राऊतला. एका बाजूला पत्रकार आणि दुसऱ्या बाजूला छापखाना, आणि त्यांना माहितीय, आज ना उद्या जागा खाली होणार. आता शिवसेनेत कोण नाहीय, आधी बाळासाहेबांवर टीका केली, उद्धवजींवर टीका केली. आता एक आरोप झालाय. पण ईडीवर बोलू नको, विडी प्यायला लावतील. मी कुणाला घाबरत नाही, तू शिवसेनेत आला कधी, शिवसेनेच्या जन्मानंतर 26 वर्षांनी आला. आम्ही शिवसेनेसाठी वाटा दिला, तू 5 पैसे तरी दिले का?, असा खोचक सवाल राणेंनी राऊतांना विचारलाय.

राणेंचा राऊतांवर लोकप्रभातील लिखाणावरुन घणाघात

त्याचबरोबर ‘बाळासाहेबांबद्दल बोललेलं मी कधी ऐकून नाही घेतलं, एवढं घाणेरडं हा बोललेला आहे. हा कसा झोळी घेऊन फिरायचा, मी पाहिलाय. का रे बा तुझा प्रवीण राऊतशी संबंध, तू पत्रकार संपादक, अजून काहीच आलं नाहीय, अजून बरंच यायचंय. पगारी नेता आहेस तू, फूकट नाही. अधिक हे कमावतो ओव्हर टाईम करुन, प्रवीणच्या चौकशीनंतर आता आपण पण अडचणीत आहोत, परबला तर होणार आपल्यालाही होणार. साडेतीन नेते सांगणार होता, आम्ही सांगितलं, तुझं, परबचं, आता तू सांग ना नावं, असं थेट आव्हानच राणेंनी राऊतांना दिलंय.

‘हा अर्धा नाही, पूर्ण राष्ट्रवादीचा आहे’

‘लोकप्रभात असताना, उद्धव आणि साहेब या दोघांवरही टीका करण्याचं सोडलं नव्हतं, आता म्हणतो, माननिय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वीदाने…तू पत्रकार नाहीच, संपादक नाही. तुझी भाषा त्या गुणवत्तेची नाहीच. बेकार आरोप करतो. हा काल अस्वस्थ का झाला, हा काल असा बेजाबदार का बोलत होता? प्रवीण राऊतने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर याचा थयथयाट झाला. पत्रकार आहेस, दे पुरावा, तुझी जमीन, 50 एकर की 50 लाखात घेतली, बरं ते पैसे आणलेस कुठून? बरं हा सुजीत पाटकर कोण? त्याच्या कंपनीत तुझ्या मुली कशा डायरेक्टर असू शकतात? स्वत: आधी उत्तरं दे, स्वत:चं बोल. शिवसेना वाढवण्यासाठी नाहीय, याचं लक्ष्य उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर बसलेत ना तिथे आहे. हा अर्धा नाही, पूर्ण राष्ट्रवादीचा आहे’, असा जोरदार टोलाही राणेंनी लगावलाय.

इतर बातम्या :

संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर, राऊत पूर्ण राष्ट्रवादीचे, त्यांना सुपारी मिळाली-राणे

19 बंगल्यांचा वाद! कोर्लई गावात मी स्वतः 18 तारखेला जाणार- किरीट सोमय्या\

सोमय्या-राऊत वादात कोर्लईच्या सरपंचानं खरं खोटं सांगितलं, त्या 19 बंगल्याचं गौडबंगाल पहिल्यांदाच उघड

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.