प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत, सरनाईकांच्या घरावर ईडीच्या छापेमारीनंतर राणेंचा टोला
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयावर ईडीने आज सकाळी धाड टाकली.
सिंधुदुर्ग : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या छापेमारीनंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी सविस्तर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, मात्र सरनाईक काय साधू संत नाहीत, असा टोला राणेंना लगावला. (Narayan Rane reacts on ED Raids at Shivsena MLA Pratap Sarnaik)
“कायदेशीर गोष्टींमध्ये चौकशी होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते. ईडी, सीबीआय, कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशा पूर्ण झाल्याशिवाय आपण भाष्य करायचं नसतं. प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत. तुम्ही आधी त्यांची माहिती घ्यावी. ईडीचा छापा पडला, हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा, मग आम्ही प्रतिक्रिया देऊ” असं नारायण राणे म्हणाले.
मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी टाकताना ईडीने स्थानिक प्रशासनाला या कारवाईचा थोडाही सुगावा लागू दिला नाही. ही कारवाई करण्यासाठी ईडीने पोलिसांची मदत घेण्याऐवजी सीआरपीएफच्या पथकाला खास पुण्याहून बोलावून घेतलं. हे पथक आल्यानंतर ईडीने एकाच वेळी सरनाईक यांच्या दहा ठिकाणांवर धाडी मारून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. ईडीने पूर्ण तयारी करूनच ही कारवाई केल्याने शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.
कुठे कुठे कारवाई?
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयावर ईडीने आज सकाळी धाड टाकली. ईडीने ठाण्यातील हिरानंदानी येथील प्रताप सरनाईक यांच्या 23व्या मजल्यावरील घरावर, वर्तकनगरमधील कार्यालयावर आणि घोडबंदर रोडवरील विहंगम हॉटेलवर आज सकाळी धाड मारली. त्याच बरोबर सरनाईक यांच्या विहंग आणि पूर्वेश या दोन्ही चिरंजीवांच्या कार्यालय आणि घरावरही धाड मारली.
घटनाक्रम काय?
सकाळी 8 वाजता विहंग सरनाईक यांच्या घरी ईडीचे पथक दाखल विहंग सरनाईक यांची चार तास चौकशी पुण्याच्या विशेष सीआरपीएफ पथकाची मदत विहंग यांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात विहंग सरनाईक यांना भाऊ पूर्वेश यांच्या घरी आणलं विहंग-पूर्वेश यांची एकत्रित चौकशी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सरनाईकांच्या घरी ईडीचे छापे
हेही वाचा : टॉवर, पार्क, कॉम्प्लेक्स ते संस्कृती दहीहंडी, प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपचा पसारा नेमका किती?
(Narayan Rane reacts on ED Raids at Shivsena MLA Pratap Sarnaik)
संजय राऊतांचा इशारा
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी या कारवाईवरून ईडी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ईडीने भाजपची शाखा असल्याप्रमाणे कारवाई करू नये. भाजपने राजकीय सुडबुद्धीतून ही कारवाई केली असून आम्ही अशा कारवायांना घाबरणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे. काळ कुणासाठी थांबत नसतो. ईडीचे हे उद्योग एक दिवस तुमच्यावरही उलटतील, असा इशाराही राऊत यांनी भाजपला दिला आहे.
आमदार प्रताप सरनाईकांचे सुपुत्र विहंग सरनाईक चौकशीसाठी ताब्यात, ईडी कार्यालयात नेण्याची शक्यताhttps://t.co/ThxoznUhlh#pratapsarnaik #edraid #shivsena #BJP #Maharashtra #vihangsarnaik
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 24, 2020
संबंधित बातम्या :
आमदार प्रताप सरनाईकांचे सुपुत्र विहंग सरनाईक चौकशीसाठी ताब्यात
भाजपचं सरकार असलेल्या राज्यात ईडीची रेड पडल्याचे दिसले नाही; बाळासाहेब थोरातांचा पलटवार
आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही, नोटीसा कसल्या पाठवता, घरी या, संजय राऊतांचं थेट चॅलेंज
(Narayan Rane reacts on ED Raids at Shivsena MLA Pratap Sarnaik)