…तर मी सरकारला सहकार्य करेन : नारायण राणे

माझ्याशीही कुणी सुडाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये," असे वक्तव्य भाजप नेते नारायण राणे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना (Narayan rane criticized cm uddhav thackeray) केले

...तर मी सरकारला सहकार्य करेन : नारायण राणे
Follow us
| Updated on: Nov 29, 2019 | 11:33 PM

मुंबई : “मी स्वत: कधीही सुडाचे राजकारण केलं नाही आणि माझ्याशीही कुणी सुडाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये,” असे वक्तव्य भाजप नेते नारायण राणे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना (Narayan rane criticized cm uddhav thackeray) केले. “मी मूळ बाळासाहेंबाचा शिवसैनिक आहे. जर या सरकारने राज्याच्या हिताचा विचार केला, तर मी या सरकारला सहकार्य करेन” असेही राणे (Narayan rane criticized cm uddhav thackeray) म्हणाले.

“महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला तर मी या सरकारला सहकार्य करेन. मात्र आकस, सूडबुद्धी आणि जनतेला चांगले दिवस आले नाही तर मग माझ्या स्टाईलने मी या सरकारवर तुटून पडल्याशिवाय राहणार नाही.” असेही नारायण राणे म्हणाले. यावेळी नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छाही राणेंनी दिल्या.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नुकतंच आरे कारशेडला स्थगिती दिली. त्यावरही राणेंनी टीका केली. आरे कारशेडला स्थगिती म्हणजे विकास ठप्प करण्यासारखा प्रकार आहे,” असे ते (Narayan rane criticized cm uddhav thackeray) म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला गैरहजर असल्याचे कारण नारायण राणेंना विचारले असता ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी मला तिन्ही पक्षांकडून आमंत्रण नव्हते. माजी मुख्यमंत्री म्हणूनही मला शपथविधीला बोलवण्याचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही. पण मी या गोष्टींवर नाराज नाही.”

“राज्यात आघाडीचे सरकार आलं असलं तरी कौल युतीला होता. तसेच उद्धव ठाकरेंनी भाजपबरोबर सत्ता स्थापन न करता वैयक्तीक स्वार्थासाठी आघाडीबरोबर सत्ता स्थापन केली.” अशी टीकाही राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.

“नवीन महाविकासआघाडीसाठी बाळासाहेबांनी यांला कधीही अनुमती दिली नसती. शिवसेनेची विचारधारा ही हिंदुत्त्ववादी आणि मराठी माणसाची आहे. उद्धवने त्याला मूठमाती दिली.” असेही ते म्हणाले.

नारायण राणेंना उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबद विचारले असता ते म्हणाले, “आता आघाडीचे नेते जे बोलतील ते उद्धव ठाकरेंना मान्य करावे लागेल. जर बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्री केलं नसतं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आधी नीट बसू देत, त्यांच्या कार्यकौशल्यावर आताच भाष्य करणार नाही. त्यांच्याकडून विकासाच्या अपेक्षा आहेत.”

“महाविकासआघाडीच्या सरकारची सूत्र ही शरद पवार यांच्याकडे असतील. या विषयावर मी काहीही भाष्य करणार नाही. आघाडी कोणी केली हे सर्वांना माहीत आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदावर खूश आहे. लोकहिताच्या खात्यांचा विचार नाही,” असेही ते (Narayan rane criticized cm uddhav thackeray) म्हणाले.

“आघाडीत तिन्ही पक्षात अंतर्गत मतभेद आहेत. शिवसैनिकाला मुख्यमंत्री फक्त बाळासाहेब करु शकतात, उद्धव नाही” अशी टीकाही त्यांनी केली.

“काँग्रेसमध्ये दुफळी आहे. तर राष्ट्रवादीत अजित पवार नाराज आहेत. त्यामुळे आतापासून या सरकारला स्थिर सरकार म्हणणं चुकीचे ठरेल. तसेच बहुमत सिद्ध करणं हा त्यांचा प्रश्न, आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि ती भूमिका बजावू.” असेही ते म्हणाले.

“भाजपने कायदेशीर आणि घटनेला धरून मार्गाने सरकार बनवण्याचे प्रयत्न केले होते. मला पक्षातील केंद्रीय नेत्यांनीही विचारलेले नाही आणि माझीही विधान परिषदेत जाण्याची तयारी नाही. मी माझ्या स्टाईलने या सरकारला घेरण्याचे काम करेन,” असेही राणे म्हणाले.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.