बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व उद्धव ठाकरेंनी करावे, राऊतांच्या मागणीवर राणेंचा टोला

"महाराष्ट्र, सांभाळता येत नाही, आणि चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला!" असा टोला नारायण राणेंनी लगावला आहे.

बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व उद्धव ठाकरेंनी करावे, राऊतांच्या मागणीवर राणेंचा टोला
Follow us
| Updated on: Aug 27, 2020 | 4:33 PM

मुंबई : बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करायला हवं, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्यानंतर भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्र, सांभाळता येत नाही, आणि चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला!” असा टोला राणेंनी लगावला आहे. (Narayan Rane taunts Sanjay Raut expecting Uddhav Thackeray to lead Non BJP led States)

‘टीव्ही 9 मराठी’ची बातमी शेअर करत नारायण राणे शिवसेनेला टोला लगावला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेला लॉकडाऊन, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण यावरुन नारायण राणे वारंवार शिवसेनेवर शरसंधान साधताना दिसतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर न पडता घरात बसून राज्याचा कारभार चालवत असल्यावर ते अनेकदा टीकेची झोड उठवतात.

संजय राऊत काय म्हणाले?

“उद्धव ठाकरे कधीही आडपदडा ठेवून बोलत नाहीत. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवं, हीच भूमिका त्यांनी मांडली. बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे यांनी करायला हवं. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल” असे राऊत म्हणाले.

“काँग्रेसमध्ये जे काय घडलं, त्यावर काँग्रेसने बोलले पाहिजे. काँग्रेस हा देशाला माहित असलेला मोठा पक्ष आहे, विरोधी पक्ष आहे. देशाला मजबूत विरोधीपक्षाची गरज आहे. पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते आहेत. संपूर्ण देशात ज्यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते काम करतील ते राहुल गांधीच आहेत. ते सक्षम आहेत. काँग्रेसने या वादळातून सावरावं आणि जमिनीवर काम करावं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

संबंधित बातम्या :

सामनाचे संपादक तोंडावर पडले, एवढं बोलायला कोणी सांगितलं होतं : नारायण राणे 

फडणवीसांना महाराष्ट्रात खूप कामे, मी मोकळाच; संजय राऊत, कधी येता कर्नाटकला? : नारायण राणे 

(Narayan Rane taunts Sanjay Raut expecting Uddhav Thackeray to lead Non BJP led States)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.