“अंगावर यायला परवानगी द्या, एकेकाला ठेचून मारुन टाकेन”, नारायण राणेंची मविआच्या कार्यकर्त्यांना धमकी

खासदार नारायण राणे हे त्या किल्ल्यावर दाखल झाले. यामुळे पोलिसांनी नारायण राणेंना मुख्य प्रवेशद्वाराबाहेर थांबवून ठेवले. यावरुन नारायण राणे आणि निलेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

अंगावर यायला परवानगी द्या, एकेकाला ठेचून मारुन टाकेन, नारायण राणेंची मविआच्या कार्यकर्त्यांना धमकी
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 1:24 PM

सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या दुर्घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर आता विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता राजकोट किल्ल्यावर भाजप विरुद्ध महाविकासआघाडीचे कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी खासदार नारायण राणे हे त्या किल्ल्यावर दाखल झाले. यामुळे पोलिसांनी नारायण राणेंना मुख्य प्रवेशद्वाराबाहेर थांबवून ठेवले. यावरुन नारायण राणे आणि निलेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकासाघाडीचे नेत्यांनी आज पाहणी केली. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत हे राजकोट किल्ल्यावर आले.

हे बाहेरुन येऊन अंगावर येणार का? निलेश राणे

आदित्य ठाकरे आले असताना नारायण राणे हे त्यांचा मुलगा निलेश राणेंसह राजकोट किल्ल्यावर दाखल झाले आहेत. यावेळी पोलिसांनी राणे आणि त्याच्या कार्यकर्त्यांना राजकोट किल्ल्याच्या पायथ्याशीच थांबवलं. यानंतर राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी पोलिसांनी सक्त ताकीद दिली. आम्ही आमचा वेळ पोलिसांना दिला होता. त्यानंतरही हे कसं काय घडलं? हे बाहेरुन येऊन अंगावर येत आहेत. हे बाहेरुन येऊन अंगावर येणार का? त्यांना गपचूप निघायला सांगा. आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लावायचा नाही. पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना हात लावायचा नाही, असे निलेश राणे म्हणाले.

रात्रभर ठेचून एकेकाला मारुन टाकेन – नारायण राणे

तर या राड्यावर खासदार नारायण राणेंनीही प्रतिक्रिया दिली. यापुढे आमचे पोलिसांना असहकार्य असेल. त्यांना येऊ दे. त्यांना आमच्या अंगावर यायला परवानगी द्या, मी एकेएकाला बघतो. घरात रात्रभर ठेचून एकेकाला मारुन टाकेन. कोणालाही सोडणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.