नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ वगळला! कशी असेल राणेंच्या यात्रेची वाटचाल?

राणेंची ही यात्रा 19 आणि 20 ऑगस्टपासून मुंबईतून सुरू होणार आहे. मात्र, आता राणेंच्या यात्रेचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. राणेंच्या या यात्रेतून युवा सेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघ वगळण्यात आला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलंय.

नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ वगळला! कशी असेल राणेंच्या यात्रेची वाटचाल?
केंद्रीय मंत्री नारायण राणे
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 9:19 PM

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. राणेंची ही यात्रा 19 आणि 20 ऑगस्टपासून मुंबईतून सुरू होणार आहे. मात्र, आता राणेंच्या यात्रेचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. राणेंच्या या यात्रेतून युवा सेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघ वगळण्यात आला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलंय. राणे यांची वरळीमध्ये नियोजित सभा होती. मात्र, ही सभाही आता रद्द करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणेंची यात्रा भाजपसाठी महत्वाची आहे. अशावेळी राणेंच्या यात्रेतून वरळी मतदारसंघ वगळण्यात आल्यामुळे चर्चा सुरु झालीय. (Union Minister Narayan Rane’s Jana Aashirwad Yatra)

कशी असेल राणेंची जनआशीर्वाद यात्रा?

नारायण राणे यांची जन-आशिर्वाद यात्रा 19 आणि 20 ऑगस्टपासून मुंबईतून सुरू होणार आहे. गुरुवार दिनांक 19 ऑगस्ट, सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करुन यात्रेला सुरुवात होईल. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. यात्रेदरम्यान नारायण राणे हे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, शिवाजी पार्क येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत.

‘बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेनेचे नाही तर संपूर्ण देशाचे’

भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, नरीमन पॉईंट येथे आयोजित पत्रकार परिषदेत जन-आशिर्वाद यात्रेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले की, जन-आशिर्वाद यात्रेमुळे मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी नक्कीच ताकद मिळेल. या यात्रेमुळे विकास व विश्वासाचं वातावरण निर्माण होईल. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेनेचे नसून संपूर्ण देशाचे आहेत. त्यामुळे त्यांचा आशिर्वाद घेण्याचा सर्वांना अधिकार आहे, असंही दरेकर म्हणाले.

इतर बातम्या :

‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका’, मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

‘बिंदू नामावलीनुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना जागा द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु’, पडळकरांचा इशारा

Union Minister Narayan Rane’s Jana Aashirwad Yatra

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.