‘जन-आशीर्वाद यात्रेला विरोध कराल तर जशास तसं उत्तर मिळेल’, भाजपचा शिवसेनेला थेट इशारा

| Updated on: Aug 26, 2021 | 3:50 PM

नारायण राणे यांच्या नेतृत्वात सुरु झालेली जन-आशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा त्याच उत्साहाने सुरु करणार असल्याची घोषणा खुद्द नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केलीय. त्यानंतर आता शिवसेनेनं जर जन-आशीर्वाद यात्रेला विरोध केला तर जशास तसं उत्तर देणार, असा इशारा कोकण जन-आशीर्वाद यात्रेचे प्रमुख आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिलाय.

जन-आशीर्वाद यात्रेला विरोध कराल तर जशास तसं उत्तर मिळेल, भाजपचा शिवसेनेला थेट इशारा
प्रमोद जठार, भाजप नेते
Follow us on

सिंधुदु्र्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक आणि त्यानंतर मिळालेला जामीन या घटनाक्रमामुळे भाजपच्या जन-आशीर्वाद यात्रेत दोन दिवस खंड पडला. मात्र, नारायण राणे यांच्या नेतृत्वात सुरु झालेली जन-आशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा त्याच उत्साहाने सुरु करणार असल्याची घोषणा खुद्द नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केलीय. त्यानंतर आता शिवसेनेनं जर जन-आशीर्वाद यात्रेला विरोध केला तर जशास तसं उत्तर देणार, असा इशारा कोकण जन-आशीर्वाद यात्रेचे प्रमुख आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिलाय. त्यामुळे भाजपच्या जन-आशीर्वाद यात्रेवरुन पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील वाद उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (BJP leader Pramod Jathar warns ShivSena on Jana Aashirwad Yatra,)

नारायण राणे यांच्या अटकेसाठी आलेले पोलीस दरवाजा तोडण्याची धमकी देत होते. मोगलाई सुरु आहे. म्हणून मी यांची तुलना औरंगजेबाशी केली. संभाजी महाराजांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. राजन साळवी यांना इतिहासाचं ज्ञान नाही. पॅसिफिक महासागरातील बेटावरुन त्यांनी डॉक्टरेट ही पदवी आणली आहे. कुणीतरी त्यांना भडकवलं आहे. असं करा नाहीतर पुढच्यावेळी तुम्हाला तिकीट नाही. आणि त्याची लस इकडे लागवी म्हणून वैभव नाईकांना सांगितलं तुम्ही नाही बोललं तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही. हे दोघेही दु:खी आत्मे आहेत. अशा शब्दात प्रमोद जठार यांनी टीका केलीय.

अनिल परब यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसलेल्या दोन कटप्पांनी बाहुबलीचा गेम केला. संजय राऊत आणि फडणवीस यांच्याकडे बघितलं तर नक्की गांजा कोण प्यायला आहे, हे लक्षात येतं. मराठा समाजाच्या आंदोलनावेळी मुका मोर्चा लिहिणाऱ्या संजय राऊत यांनी त्यावेळी गांजाची की अफूची गोळी घेतली होती? असा खोचक सवालही प्रमोद जठार यांनी विचारला आहे.

सिंधुदुर्गात जनआशीर्वाद यात्रा नियम पाळून होणारच

यात्रेला विरोध करायला आमदार वैभव नाईक यांनी यावं. मग आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ… हत्ती चालतो तेव्हा कुत्रे भुंकत असतात. नियम पाळून आम्ही यात्रा काढणार आहोत. यात्रा निघणारच…. सिंधुदुर्गात यात्रेचा दिमाखदार शेवट होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

राणेंच्या स्वागतासाठी कणकवली शहर सज्ज

नारायण राणे यांच्या स्वागतासाठी त्यांचा बालेकिल्ला असलेलं कणकवली शहर सज्ज झालंय. अगदी पहिल्यापासून राणेंना ज्या कणकवलीने डोक्यावर घेतलं, त्यांना कधी अंतर दिलं नाही, त्याच राणेप्रेमी कणकवली शहरांत चौकाचौकात राणेंच्या स्वागताला गुढ्या उभारल्या गेल्या आहेत. कालच्या राणे-सेना राड्यानंतर दादांचं जंगी स्वागत करण्यासाठी राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी कंबर कसलीय.

नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेतील नियोजित कणकवली दौरा होता. परंतु त्यांनी केलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वक्तव्याने मंगळवारी दिवसभर राडा झाला. पोलिसांनी त्यांना अटक केली. रात्री उशिरा त्यांना जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री त्यांनी महाडवरुन मुंबईकडे प्रयाण केलं. बुधवार आणि गुरुवारी आराम करुन ते शुक्रवारी जनआशीर्वाद यात्रा सुरु करणार आहेत.

संबंधित बातम्या :

भाजपच्या पोकळ धमक्यांना राज्यातील कुठलाही नेता घाबरत नाही; नवाब मलिकांनी सुनावले

आता जर भाजपच्या कार्यालयावर हल्ला झाला तर ईट का जवाब पत्थर से देंगे, बावनकुळेंचा इशारा

BJP leader Pramod Jathar warns ShivSena on Jana Aashirwad Yatra,