Video| तर कदाचित तू नसतास, नारायण राणेंचे राऊतांवर गंभीर आरोप, कुंडली मांडण्याची धमकी

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच राऊतांची कुंडली माझ्याकडे आहे, ती मला मांडायला लावू नका असा इशारा देखील यावेळी राणेंनी दिलाय.

Video| तर कदाचित तू नसतास, नारायण राणेंचे राऊतांवर गंभीर आरोप, कुंडली मांडण्याची धमकी
नारायण राणे
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 5:17 PM

मुंबई : मंगळवारी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनासमोर पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजप (bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता नारायण राणे यांनी देखील आज पत्रकार परिषद घेतली असून, त्यांनी राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. लोकप्रभामध्ये असताना राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आता तेच राऊत म्हणतात की, माझ्यामागे माननीय बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचा आर्शीवाद आहे. मात्र संजय राऊतांनी हे विसरू नये की त्यांची कुंडली माझ्याकडे आहे. मी ती केव्हाही बाहेर काढू शकतो असा इशारा यावेळी नारायण राणे यांनी राऊतांना दिला आहे.

काय म्हणाले राणे?

लोकप्रभात असताना संजय राऊत यांनी उद्धव ठकरेंवर टीका केली होती. एवढंच काय तर त्यांनी शिवसेना प्रमुख बळासाहेब ठाकरेंना देखील सोडलं नव्हत. त्यांनी बाळासाहेबांवर देखील टीका केली होती. हेच राऊत शिवसेना स्थापन झाल्यानंतर 26 वर्षांनी शिवसेनेत आले आणि आता म्हणत आहेत की, माझ्यामागे बाळासाहेबांचा आर्शीवाद आहे. उद्धव ठाकरेंचा आर्शीवाद आहे. मात्र माझ्याकडे देखील राऊतांची संपूर्ण कुंडलीच आहे. ती मी कधीही बाहेर काढू शकतो हे राऊतांनी लक्षात ठेवावे. राऊत हे काहीही पुरावा नसताना आरोप करत आहोत. ते पत्रकार किंवा संपादक नाहीच त्यांची भाषा देखील त्या पातळीची नसल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे.

राणेंचे राऊतांना सवाल

पुढे बोलताना राणे म्हणाले की, राऊत हे कुठलाही पुरावा नसताना आरोप करतात. त्यांनी मला सांगावं की ती 50 एकर जमीन कशी आली? सुजीत पाटकर कोण आहे आणि त्यांच्या कंपनीत राऊतांच्या मुली डायरेक्टर कशा? असे अनेक प्रश्न राणे यांनी उपस्थित केले आहेत. संजय राऊत यांची ही सर्व धडपड शिवसेना वाढवण्यासाठी नाही तर उद्धव ठाकरे सध्या ज्या खुर्चीवर बसले आहेत, ती खुर्ची मिळवण्यासाठी आहे. असा गंभीर आरोप देखील यावेळी नारायण राणे यांनी केला आहे.  संजय राऊत अर्धे नाही तर पूर्णपणे राष्ट्रवादीचे आहेत. शिवसेना वाढवण्यामध्ये राऊतांचे योगदार काय आहे? शिवसेना स्थापन झाल्यानंतर ते 26 वर्षांनी शिवसेनेत आले. जर शिवसेना नसती तर कदाचित ते इथपर्यंत पोहोचू शकले नसते.  राऊतांची संपूर्ण कुंडलीच माझ्याकडे आहे, त्यांनी मला आता तोंड उघडायला लावू नये असा इशारा यावेळी संजय राऊतांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

Narayan Rane Press Conference : ‘ईडीवर बोलू नको, बीडी प्यायला लावतील’, राणेंच्या वक्तव्यावर गंभीर वातावरणही मोकळं झालं

संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर, राऊत पूर्ण राष्ट्रवादीचे, त्यांना सुपारी मिळाली-राणे

चर्चा तर होणारचः नाशिक महापालिकेची एप्रिलमध्ये निवडणूक; मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता? 

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.