Narayan Rane | ‘कारभार करायला अक्कल लागते’, अजित पवारांना नारायण राणेंचं प्रत्युत्तर
फक्त अक्कलच नाही, तर अर्थसंकल्पावरुनही नारायण राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.
सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेलं होतं, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. सिंधुदुर्गात (Sindhudurg) पत्रकारांशी बोलताना नारायण राणे बोलत होते.
पत्रकार परिषदेदरम्यान नारायण राणे यांना अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना नारायण राणे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय. कारभार करायला अक्कल लागते, असं नारायण राणे यांनी म्हटलंय. संस्था उभी करायला अक्कल लागते, हे वक्तव्य अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून होतं, असा टोला नारायण राणेंनी लगावला. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सरकारमधील केलेल्या कारभारात किती अक्कल लावली आहे, हे जनतेला कळून चुकलं आहे, असं म्हणत राणेंनी अजित पवारांना उत्तर दिलंय.
संचयीत भ्रष्टाचार, राणेंचा आरोप
अजित पवारांनी अक्कल काढल्यानं नारायण राणेंनी अजित पवारांना जोरदार टीका केली आहे. संचयनीमध्ये भ्रष्ट्राचार झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. या आरोपप्रकरणी खटले दाखल झाले असल्याचा दावाही राणेंनी यावेळी केला.
नेमकं अजित पवार काय म्हणाले होते?
रत्नागिरीत बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं होतं की,….
मतदान करत असताना फार विचारपूर्वक मतदान करा. संस्था उभ्या करायला डोकं लागतं, अक्कल लागते. संस्था बुडवायला डोकं लागत नाही, अक्कल लागत नाही.
आणखी काय म्हणाले राणे?
संस्था उभी करायला अक्कल लागते, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना नारायण राणेंनी अजित पवारांचा खरपूस समाचार घेतला आहे.
फक्त अक्कलच नाही, तर अर्थसंकल्पावरुनही नारायण राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. मी 100 कोटी देऊन जा म्हणालो होतो, लघुपाटबंधारेचं टेंडर अद्याप झालं नाहीए. 13 कोटी मागितले होते, त्याच्यापैकी फक्त 6 कोटी आले. पण एकही रुपया खर्च झाला नाही. बजेटची भाषा करतात. त्यांना बजेट अर्थात अर्थसंकल्प नेमका समजतो का? असं म्हणत नारायण राणेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय.
इतर बातम्या –
Special Report | वसुलीसाठी एनसीबीची प्रायव्हेट आर्मी ?
Special Report | माझ्या हत्येचा कट, भाजप नेते गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप