खासदार संजय राऊत हे माझंच पाप अन्… नारायण राणेंचं हेच ते वक्तव्य, ज्यावरून नोटीस बजावणार, पाहा Video

नारायण राणे यांनी माझ्या खासदारकीसाठी पैसे खर्च केले म्हणजे नेमकं काय केलं, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय.

खासदार संजय राऊत हे माझंच पाप अन्... नारायण राणेंचं हेच ते वक्तव्य, ज्यावरून नोटीस बजावणार, पाहा Video
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 12:04 PM

 मुंबईः संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरोधात मानहानीची नोटीस बजावण्याची तयारी सुरु केली आहे. एक तर माफी मागा किंवा तुमचे आरोप कोर्टात (Court) सिद्ध करा, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलंय. नारायण राणे यांनी आतापर्यंत शिवसेना नेते आणि संजय राऊत यांच्यावर अनेक आक्रमक वक्तव्य केली आहेत. नेमक्या कोणत्या वक्तव्यावरून संजय राऊत त्यांना नोटीस बजावत आहेत, असा प्रश्न विचारला जातोय. संजय राऊतांना राज्यसभेत खासदार बनवण्यासाठी मी पैसे खर्च केल्याचा आरोप राणे यांनी केला होता. नेमक्या याच वक्तव्याचा खुलासा आता त्यांना द्यावा लागणार आहे. हे वक्तव्य नेमकं काय ते पाहुयात-

काय म्हणाले होते नारायण राणे?

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात नारायण राणे म्हणाले, हा संपादक आहे. याने चांगलं लिहावं. हा खासदार आहे, हे माझंच पाप आहे. बाळासाहेबांनी त्या वेळेला मला बोलावलं. संजय राऊतला खासदार बनवायचंय. उद्या फॉर्म घेऊन जा, त्याला खासदार कर. मी साहेबांसमोर कधी नाही म्हणाले नाही.

दुसऱ्या दिवशी मी विधानभवनात त्याला बोलावलं. हा संजय राऊत खासदार बनायला निघाला. इलेक्शन यादीत नाव नव्हतं. स्कुटिनीत त्याला मी पास करून घेतलं. इलेक्शन रोलमध्ये नाव नसताना… हा खासदार बनवायला मी पैसे खर्च केले. आज रक्कम सांगणार नाही. एवढे उपकार केले. खर्च मी केला. आणि हा माझ्यावर टीका करतो.. असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं.

संजय राऊत यांचा आक्षेप काय?

नारायण राणे यांनी माझ्या खासदारकीसाठी पैसे खर्च केले म्हणजे नेमकं काय केलं, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. तसंच 2004साली उमेदवारांच्या यादीत माझं नाव नव्हतं हे नारायण राणे यांचं वक्तव्यही खोटं असल्याचं राऊत म्हणालेत. नारायण राणे मी खासदार बनवलं म्हणतात, पण आम्हाला सर्व पदं आधी बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहेत, असं संजय राऊत यांनी ठामपणे सांगितलं. याच वक्तव्यावरून नारायण राणे यांनी माफी मागावी, अन्यथा कोर्टात आपलं म्हणणं सिद्ध करावं, असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.