भर सभेत पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींकडून अजित पवारांचा उल्लेख
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नगरमध्ये जाहीर सभा झाली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या स्टाईलमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं. मोदींनी नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्ला चढवलाच, मात्र मोदींनी आजच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. मोदी म्हणाले, “काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी सरकारच्या काळात घोटाळे केले. सध्या महायुतीच्या सरकारने पाण्यासाठी केलेली कामं एकीकडे […]
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नगरमध्ये जाहीर सभा झाली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या स्टाईलमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं. मोदींनी नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्ला चढवलाच, मात्र मोदींनी आजच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला.
मोदी म्हणाले, “काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी सरकारच्या काळात घोटाळे केले. सध्या महायुतीच्या सरकारने पाण्यासाठी केलेली कामं एकीकडे तर आघाडीचे घोटाळे आणि अजित पवारांचं लाजिरवाणं वक्तव्य दुसरीकडे. अशा गुन्ह्यांमुळे देशाच्या जनतेने काँग्रेसचं मन आणि नियत ओळखली आहे. त्यामुळेच आता जनतेने नारा दिला, काँग्रेस कायमस्वरुपी हटवा, तेव्हाच गरिबी हटेल, काँग्रेस हटवा, देश विकास करेल”
मोदींचा शरद पवारांवर हल्ला दरम्यान, या सभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला. काँग्रेसशी फारकत घेऊन वेगळे झालेले शरद पवार हे पुन्हा त्यांच्यासोबत आहेत. मात्र ते भारताकडे विदेशी चष्म्यातून बघत आहेत. शरद पवारांच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी आहे. हे नावही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आहे का. तुमचे सहकारी जाहीरपणे भारतात दोन पंतप्रधान करण्याच्या बाता करत आहेत. छत्रपतींच्या भूमितील असलेल्या शरद पवारांना झोप कशी येते?, असा सवाल मोदींनी केला.
शरद पवारांनी देशाच्या नावे काँग्रेस सोडली होती. आता देशात दोन पंतप्रधानाच्या बाता केल्या जात आहेत, शरद पवार कधीपर्यंत गप्प राहणार, अशीही विचारणा मोदींनी केली.
काँग्रेस फुटीरतावाद्यांसोबत आहे, त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा नाही. मात्र, शरद पवार यांना काय झाले, ते यांच्यासोबत कसे, शरद पवारांनी देशाच्या स्वाभिमानाच्या कारणावरून काँग्रेस सोडली होती. आता पुन्हा त्यांच्यासोबत कशी काय हातमिळवणी केली. आपणही विदेशी नजरेतून देशाकडे पाहता का? आपल्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी ही केवळ धुळफेक आहे का- मोदींचा पवारांना सवाल
संबंधित बातम्या
ना काळा शर्ट, ना रुमाल, हद्द म्हणजे मोदींच्या नगरमधील सभेत काळी बनियनही बॅन