नरेंद्र मोदींना जावं लागेल, मोदी सरकारचं काऊंटडाऊन सुरू झालंय; नाना पटोले यांचा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काऊंट डाऊन सुरु झाला आहे. महायुतीत एकदा लोकसभा तिकीट वाटप होऊ द्या त्यानंतर यांच्यात कशी फाटाफूट होतेय ते पाहाच असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. टीव्ही 9 मराठी वाहीनीच्या लोकसभेचा महासंग्राम कॉक्लेव्ह कार्यक्रमात बोलताना पटोले यांनी हा दावा केला आहे.
मुंबई | 1 मार्च 2024 : राज्यात आत्महत्या सुरु आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या 94 टक्क्यांवर गेली आहे. ओबीसी विरुध्द मराठा, धनगर विरुध्द आदिवासी हा वाद मुद्दाम निर्माण केला जात आहे. राज्यात घाणेरडे राजकारण सुरु आहे. यवतमाळ येथील मेळाव्यात यांना महिलांना जबरदस्ती आणावे लागले. खुर्च्यांवर देखील राहुल गांधी यांचे फोटो होते. त्यामुळे एकदा लोकसभेचे तिकीट वाटप होऊ द्या मग यांच्यात कशा माऱ्यामाऱ्या सुरु होतील ते पाहाच असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. देशातील जनता यांना कंटाळली असून नरेंद्र मोदींना यावे लागेल, मोदी सरकारचं काऊंटडाऊन सुरु झाले असल्याचे पटोले यांनी टीव्ही 9 मराठीच्या ‘लोकसभेचा महासंग्राम’ कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाचे प्रचारक होते. त्यामुळे ते प्रचारक म्हणून काम करीत आहेत. त्यांना देशाचे काही पडलेले नाही. येथून पुढे आता सरकार फोडण्यासाठी स्वतंत्र बजेटमध्ये तरतूद करावी अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. लपून छपून गुवाहाटी आणि सुरत कशाला करता? आमदार फोडण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करा असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मी असाच एक जुना इंटरव्ह्यू ऐकला. राष्ट्रवादीला केव्हाच यांना सोबत घेणार नाही. सोबत घेतले तर लग्न करणार नाही. असे कोण म्हणाल होते. नाना पटोले म्हणाले का ? फडणवीसच म्हणाले ना. हा खोटारडेपणा त्यांचा आहे. आमच्याकडे खोटारडेपणा नाही. आम्ही सोनिया गांधींचे शिष्य आमच्या रक्तात त्याग आहे. इव्हेंट करणं नौटंकी करणं हे आमचं काम नाही असेही नाना पटोले म्हणाले.
कार्यकर्ते आणि पक्ष नेत्याला मोठे करतो
कॉंग्रेसचे एकापाटोपाट मोठे नेते भाजपात गेले यावर विचारले असता पटोले यांनी जे गेले त्यांना कोणी मोठं केलं. त्यांना काँग्रेसनेच मोठं केलं. कार्यकर्त्यांनीच मोठं केलं. मला काँग्रेस आणि जनतेने संधी दिली नसती तर मी आजही शेतात काम करत असतो. जनता आणि कार्यकर्ताच नेत्याला मोठं बनवतो. आईच्या पोटातून कोणी नेता बनत नाही असेही पटोले यांनी सांगितले. येत्या काही दिवसात लोकसभेचे तिकीट वाटप होऊ द्या त्यानंतर कोण-कोणासोबत आहे हे कळणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पंधरा दिवसात नांदेडमध्ये आमचे 15 टक्के मतदान वाढल्याचे त्यांनी सांगितले.