पंतप्रधान मोदी सरेंडर नव्हे तर धुरंधर, राज्यात काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं : रामदास आठवले

पंतप्रधान मोदी हे सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत,असं म्हणत रामदास आठवलेंनी राहुल गांधींवर भाष्य केलं. Narendra Modi Dhurandar said Ramdas Athawale

पंतप्रधान मोदी सरेंडर नव्हे तर धुरंधर, राज्यात काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं : रामदास आठवले
Follow us
| Updated on: Jun 22, 2020 | 2:18 PM

मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत. साऱ्या देशात नरेंद्र मोदींची हवा त्यामुळे राहुल गांधी अत्यंत परेशान आहेत”, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. नुकतंच भारत-चीन तणावावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. त्याला आठवलेंनी उत्तर दिलं. (Narendra Modi Dhurandar said Ramdas Athawale)

रामदास आठवले म्हणाले, “सर्व पक्षांनी पंतप्रधान मोदींच्या मागे उभं राहायला हवे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करतो. निवडणूक आल्यावर सरकारने अथवा मोदींनी आपले जवान शहीद केले असे म्हणणे चुकीचे आहे. आपला भारत आता 1962 चा भारत राहिला नाही हे चीनने लक्षात घ्यावे”

विखे-थोरात वादावर भाष्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची कुरकुर नाही तर कुरबूर आहे विखे पाटलांना मी ओळखतो त्यांच्याबद्दल भाजपमध्ये अस्वस्थ आहेत असं बोलणं चुकीचं आहे, असंही रामदास आठवलेंनी नमूद केलं.

काँग्रेसला विश्वासात घेतले जात नाही. काँग्रेसला सातत्याने अपमान सहन करावा लागत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे. काँग्रेसच्या आमदारांच्या पाठिंब्यावर हे सरकार आहे हे विसरु नये. काँग्रेसने पाठिंबा काढला तर हे सरकार पडेल, असं रामदास आठवलेंनी सांगितलं.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

चीनबरोबर वाढत्या तणावाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा हल्लाबोल चढवला. मोदी बीजिंगला ‘शरण’ गेल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. नरेंद्र मोदी हे खरं तर ‘सरेंडर’ मोदी आहेत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी टीका केली. ‘जपान टाईम्स’मधील एका लेखाची लिंक शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

(Narendra Modi Dhurandar said Ramdas Athawale)

संबंधित बातम्या 

नरेंद्र मोदी खरं तर ‘सरेंडर’ मोदी, राहुल गांधी यांचा निशाणा   

Rahul Gandhi asks PM | पंतप्रधान गप्प का? जवानांना मारण्याची चीनची हिंमत कशी? राहुल गांधी यांची प्रश्नांची सरबत्ती 

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.