Deepak Kesarkar : नार्वेकरांची चर्चा जोमात, केसरकरांनी मात्र उकल करुनच सांगितल्या शक्यता..!

मध्यंतरी थापा जे बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर सावलीप्रमाणे असायचे त्यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरुनही राजकारण सुरु झाले होते.

Deepak Kesarkar : नार्वेकरांची चर्चा जोमात, केसरकरांनी मात्र उकल करुनच सांगितल्या शक्यता..!
मंत्री दीपक केसरकर
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 3:43 PM

महेश सावंत, Tv9 मराठी, सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरेंचा राइट हॅंड म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे सुद्धा आता शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा जोमात सुरु आहे. याबाबत जर तर वरुन राजकारण सुरु आहे. मात्र, शिंदे गटाचे प्रवक्ते तथा मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी हे कसे घडू शकते हे उदाहरणासहीत स्पष्ट सांगितले आहे. थापा हा बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत सावली सारखा होता. त्याने काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. मिलिंद नार्वेकर हे देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण आपण बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जात आहोत ही भावना यांचीदेखील होत असल्याने शिंदे गटात प्रवेश सुरु आहेत. त्यामुळे उद्या मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात आले तर नवल वाटायला नको असा टोला केसरकरांनी लगावला आहे.

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे राइट हॅंडच राहिलेले आहेत. थेट समोर नाही पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिलेले आहेत. गणेशोत्सवात मुख्यमंत्री त्यांच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला आल्यापासून नार्वेकर देखील शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु आहे. आता पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

मध्यंतरी थापा जे बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर सावलीप्रमाणे असायचे त्यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरुनही राजकारण सुरु झाले होते. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर नार्वेकर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले सर्वच शिंदे गटात प्रवेश करीत आहे. कारण खऱ्या शिवसेनेचे विचार एकनाथ शिंदे हेच पुढे घेऊन जाणार असल्याचे केसरकरांनी सांगितले आहे. त्यामुळे अगदी जवळ असलेल्या लोकांना देखील पक्षप्रमुखांचा निर्णय पटलेला नसल्याचे केसरकरांनी म्हटले आहे.

राजकारणात काहीही होऊ शकते पण एकेकाळी आपल्या जवळ असलेलेही असा निर्णय का घेत आहेत याचा विचार होणे गरजेचे होते. मात्र, घटक पक्षाच्या पुढे आपल्या पक्षाचे काय झाले याचा विसर पडत असल्याने ही अवस्था झाली आहे. त्यामुळे थापा पाठोपाठ नार्वेकर आले तरी नवल वाटण्यासारखे काही नाही असेही केसरकर म्हणाले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.