Breaking | भाजपचे पत्ते अखेर उघडले, नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार…

काँग्रेसला ऐनवेळी धोका देणाऱ्या सत्यजित तांबे यांना भाजपाचा पाठिंबा असेल की नाही, याबाबत आजपर्यंत गुप्तता ठेवण्यात आली होती. मात्र आता भाजपचे पत्ते हळू हळू उघडण्यास सुरुवात झाली आहे.

Breaking | भाजपचे पत्ते अखेर उघडले, नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 2:34 PM

मनोज गाडेकर, नाशिकः नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय. काँग्रेससोबत दगाफटका केलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना भाजपाचा पाठिंबा मिळणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नाशिकच्या जिल्हाध्यक्षांशी यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा नाशिक दौरा आहे. या दौऱ्यात भाजप अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आता शुभांगी पाटील विरुद्ध सत्यजित तांबे अशी थेट लढत असेल. काँग्रेसला ऐनवेळी धोका देणाऱ्या सत्यजित तांबे यांना भाजपाचा पाठिंबा असेल की नाही, याबाबत आजपर्यंत गुप्तता ठेवण्यात आली होती. मात्र आता भाजपचे पत्ते हळू हळू उघडण्यास सुरुवात झाली आहे.

प्रदेशाध्यक्ष लवकरच जाहीर करणार…

नाशिकच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना भाजपाचा पाठींबा देण्यावर बड्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील भाजप जिल्हाध्यक्षांची या विषयावर ऑनलाईन चर्चा झाली. या चर्चेत सत्यजित तांबेंना पाठींबा देण्याचा झाल्याचं खात्रीलायक सूत्रांनी म्हटलंय.

बाळासाहेब थोरांतांच्या अडचणीत वाढ?

सत्यजित तांबे हे काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे यांचे पुत्र आहेत. तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. सत्यजित तांबे हेदेखील काँग्रेसचे युवा नेते म्हणून प्रसिद्ध होते. पण नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ऐनवेळी तांबे पिता-पुत्रांनी वेगळा निर्णय घेतला. महाविकास आघाडी तर्फे डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता.

पण डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास नकार दिला. तर सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. तांबे यांच्या या निर्णयामागे भाजपची खेळी असल्याचं म्हटलं जात होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचक वक्तव्याचाही दुजोरा दिला जात होता. मात्र अद्यापपर्यंत भाजपने त्यांना उघडपणे पाठिंबा दिला नव्हता.

त्यामुळे भाजपच्या मनात नेमकं काय चाललंय, याचा थांगपत्ता लागत नव्हता. आता अखेर सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा देणार असल्याचं समोर आलंय. मात्र कुटुंबियांनी ऐनवेळी काँग्रेसला दगा दिल्याने बाळासाहेब थोरात यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.